---Advertisement---

अफगाणिस्तानला पछाडण्यासाठी ‘थिंक टॅंक’ने कसली कंबर; सराव सत्रात आखली रणनिती

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 2:27 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाची २०२१ टी२० विश्वचषकातील सुरूवात अत्यंत डळमळीत झाली आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीन सामन्यात मोठ्या फरकाने विजय नोंदवावे लागतील. तसेच, या गटातील इतर सामन्यांवरही नजर ठेवावी लागेल. भारताचा पुढील सामना बुधवारी (३ ऑक्टोबर) अबुधाबी येथे अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ आयसीसी अकादमीत वैकल्पिक सराव करताना दिसून आला. त्यावेळी संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व मेंटर एमएस धोनी हे विशेष रणनीती आखताना दिसले.

भारतीय खेळाडूंचा वैकल्पिक सराव
तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे वैकल्पिक सराव (ऑप्शनल प्रॅक्टिस) सत्र आयोजित केले गेले होते. यामध्ये खेळाडूंना सराव करण्याचे बंधन नसते. मात्र, कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी काही काळ नेटमध्ये घाम गाळला. प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, यष्टीरक्षक रिषभ पंत व केएल राहुल हे खेळाडू मैदानावर देखील उतरले नाहीत. दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पंड्या याने मैदानावर हजेरी लावली. मात्र, त्याने सराव केला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला दुखापतीमुळे मुकलेला मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने मैदानावर येत काही काळ धावण्याचा सराव केला. त्यावेळी संघाचे ट्रेनर त्याच्यासोबत दिसून आले.

विजय झाला गरजेचा
सलग दोन पराभवामुळे मागे पडलेला भारतीय संघ अफगाणिस्तानला पराभूत करून मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल. भारताचे त्यानंतर दोन सामने शिल्लक राहतील. हे सामने नामिबिया व स्कॉटलंड यांच्याविरुद्ध अनुक्रमे ५ व ८ नोव्हेंबर रोजी खेळले जाणार आहेत. या गटातून पाकिस्तानने सलग चार विजयांसह उपांत्य फेरीत जागा पक्की केली असून, न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांना उपांत्य फेरी गाठण्याची सर्वाधिक संधी असेल. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतर संघांच्या सामन्यांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

https://mahasports.in/updated-point-table-of-t20-world-cup-2021-after-pakvman-match/

https://mahasports.in/jane-green-taken-unbelievable-catch-against-pakistan-in-icc-t20-world-cup/

https://mahasports.in/updated-point-table-of-t20-world-cup-2021-after-pakvman-match/

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---