बुधवारी (०४ मे) आयसीसीने संघांची वार्षिक क्रमवारी (ICC Annual Ranking) जाहीर केली आहे. आयसीसीद्वारे घोषित कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघाने अव्वलस्थान पटकावले आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. याउलट टी२० क्रमवारीत भारतीय संघाला भरपूर झाला फायदा आहे. भारतीय संघ टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर वनडे क्रमवारीतही संघाचे पहिल्या ५ जणांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.
कसोटी क्रमवारीबद्दल (Test Ranking) बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या क्रमांकाचा ताज मिळवला आहे. सर्वाधिक १२८ गुणांसह ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर भारतीय संघ ११९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत मे २०१९ ते मे २०२२ दरम्यानच्या कसोटी मालिकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानविरुद्धच्या १-०ने मिळवलेल्या कसोटी मालिकेचा क्रमवारीत फायदा झाला आहे. न्यूझीलंड संघ १११ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ ११० गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वनडे क्रमवारीत न्यूझीलंडचा दबदबा
वनडे क्रमवारीमध्ये (ODI Ranking) न्यूझीलंडचा संघ अव्वलस्थानावर आहे. त्यांच्या खात्यात १२५ गुण आहेत. त्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या व ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघानेही दक्षिण आफ्रिकेला मागे सोडत पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानचे संघ अनुक्रमे ७ ते १० क्रमांकावर आहेत. तर ऑकलँड संघाने ११वा क्रमांक मिळवला आहे.
https://twitter.com/ICC/status/1521739164965871618?s=20&t=Y6EEioPo4QNnXGpLlMkFVw
टी२० क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी
टी२० क्रमवारीत (T20 Ranking) मात्र भारतीय संघाला (Team India) भरपूर फायदा झाला आहे. इंग्लंडला ५ गुणांनी मागे टाकत भारतीय संघ टी२० क्रमवारीत प्रथमस्तानी पोहोचला (Team India Top) आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१मधील प्रदर्शनाला वगळता भारतीय संघाचे टी२० मालिकेतील प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे. टी२० विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मायदेशात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला टी२० मालिकेत पराभूत केले होते.
भारतापाठोपाठ इंग्लंडचा संघ २६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तान संघाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ टी२० क्रमवारीत न्यूझीलंडच्या पुढे निघून गेले आहेत. न्यूझीलंड संघ सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. बांगलादेश आणि श्रीलंकेचे संघही अफगाणिस्तानच्या पुढे आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एप्रिल महिन्यासाठी आयसीसीचे ‘प्लेयर ऑफ द मंथ’ नामांकन ‘या’ तिघांना, भारतीय वंशाचा क्रिकेटरही सामील
द्रविडची ‘ती’ गोष्ट पाहून सॅमसन झालेला चकीत, फलंदाजी करतानाच्या आठवणीचाही केला खुलासा
बापरे बाप! विराट अन् रैनाला मागे टाकत धवन ‘या’ विक्रमात पोहोचला शिखरावर, ‘हिटमॅन’शी साधली बरोबरी






