इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरी देखील भारतीय संघाने याची दखल घेतली नाही. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
नुकतेच इंग्लंड संघाचे ३ खेळाडू आणि ४ सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला संपूर्ण संघ बदलावा लागला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघातील खेळाडू मोकळेपणाने इंग्लंडमध्ये फिरताना दिसून येत आहेत. ज्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाढली आहे. जर भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर त्यांना इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर व्हावे लागू शकते.
भारतीय संघातील खेळाडू १४ जुलै रोजी लंडनमध्ये पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. इथून त्यांना ‘सलेक्ट काउंटी इलेव्हेन’ संघाविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी डरहमला जायचे आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, “आम्ही येथील स्थितीसोबत परिचित आहोत. विद्यमान आरोग्य संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल केल्यास, ईसीबी (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) आणि स्थानिक आरोग्य अधिकारी ते आमच्यासाठी उपलब्ध करुन देतील आणि काटेकोरपणे त्याचे पालन केले जाईल.” (Team India vacation continue despite England covid 19 cases spike)
सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत भारतीय खेळाडू
भारतीय खेळाडू हे लंडन किंवा लंडनच्या जवळपास असलेल्या भागात आपल्या कुटुंबासोबत मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत तर चक्क भर गर्दीत युरो कपचा सामना पाहण्यासाठी गेला होता. लंडनमध्ये एकत्र आल्यानंतर या खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे, ज्यामध्ये खेळाडूंचा अहवाल निगेटीव्ह आला तर त्यांना बायो बबलमध्ये प्रवेश दिला जाईल.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-