मुंबई । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून यासाठी बीसीसीआयने आज संघाची घोषणा केली.
मुंबई येथे बीसीसीआयच्या मुख्यालयात ही घोषणा निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केली.
या संघात कर्णधार विराट कोहलीने कमबॅक केले असून अंबाती रायडू, केदार जाधव यांना टी२० मालीकेत विश्रांती देण्यात आली असून अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा यांना वनडे आणि टी२० संघातून वगळण्यात आले आहे.
असा आहे टी२० मालिकेसाठी भारतीय संघ- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, विजय शंकर, केएल राहुल, , जसप्रीत बुमराह, युझवेद्र चहल, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे
असा आहे पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, युझवेद्र चहल, रिषभ पंत
असा आहे उर्वरित तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेद्र चहल, रिषभ पंत
२४ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाबरोबर २ टी२० सामने खेळणार आहे. पहिला सामना विशाखापट्टनम तर दुसरा सामना बेंगलोरला होणार आहे.
त्यानंतर 2 मार्चपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
टी20 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तर वनडे सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.
ही मालिका दोन्ही संघासाठी मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
या मालिकेतील केवळ एकच सामना महाराष्ट्रात होणार आहे. हा मालिकेतील दुसरा सामना असून तो ५ मार्च रोजी नागपुर येथे होणार आहे.
असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा –
टी20 मालिका –
पहिला टी20 सामना – 24 फेब्रुवारी – बंगळूरु – वेळ: संध्या. 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना – 27 फेब्रुवारी – विशाखापट्टणम – वेळ: संध्या. 7.00 वाजता
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता
चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता