---Advertisement---

निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची वाढली चिंता; दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर

On: शुक्रवार, जुलै 17, 2026 2:00 PM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या IND VS ENG तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी TEAM INDIA टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. संघाचा फिरकी अष्टपैलू खेळाडू WASHINGTON SUNDER INJURED वॉशिंग्टन सुंदर कदाचित शेवटच्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. सुंदरने मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली होती.

त्याच्या दुखापतीमुळे कर्णधार SHUBMAN GILL शुबमन गिलची चिंता नक्कीच वाढली आहे. दुखापतीमुळे वॉशिंग्टनला दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीही करता आली नाही, ज्याचा फटका संघाला बसला. परिणामी, त्यांना पराभव पत्करावा लागला. टीम इंडिया आधीच अष्टपैलू खेळाडूंच्या कमतरतेचा सामना करत आहे. त्यातच सुंदरच्या दुखापतीमुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.

टीम इंडियाचे स्टार अष्टपैलू खेळाडू HARDIK PANDYA हार्दिक पांड्या आणि NITISH KUMAR REDDY नितीश कुमार रेड्डी हे देखील दुखापतग्रस्त आहेत. हार्दिक पांड्या आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज होता, परंतु सरावादरम्यान त्याला पुन्हा दुखापत झाली, ज्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर पडला.

हार्दिकच्या दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डीचा संघात समावेश करण्यात आला होता. नितीश अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही संघासोबत होता, परंतु टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावरील रवानगीपूर्वी तो दुखापतग्रस्त असल्याचे आणि पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे वृत्त आले, ज्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. या दोघांच्या दुखापतींमुळे, सध्या शिवम दुबेला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभवावी लागत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---