जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी अनेक भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये आहेत. अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत दुसरा भारतीय संघ हा श्रीलंका दौरा करणार आहे. १३ जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघ जाहीर केला आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना या संघात जागा मिळाली आहे. तत्पुर्वी भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे.
शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला या दौऱ्यात एकही सराव सामना खेळता येणार नाही. भारतीय संघाने श्रीलंका ए किंवा दुसऱ्या उपलब्ध संघासोबत सराव सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु या गोष्टीला श्रीलंका बोर्डाकडून नकार देण्यात आला आहे. कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूज एजन्सी एएनआईच्या एका वृत्तानुसार, भारतीय संघाची सराव सामना खेळण्याची इच्छा होती. त्यांची इच्छा होती की, श्रीलंका ए किंवा कोणताही संघ जो उपलब्ध असेल त्यांच्यासोबत सराव सामना खेळावा. परंतु कोरोना व्हायरसमुळे ते संभव नाही. भारतीय संघाने बीसीसीआयला इंट्रास्क्वॉड सामना खेळण्यासाठी विनंती केली आहे. यामुळे आता भारतीय संघ इंट्रास्क्वॉड सराव सामन्यादरम्यान एक टी-२० आणि दोन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक नवीन चेहऱ्यांना जागा दिली गेली आहे. कृष्णप्पा गौतम, चेतन सकारिया, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा हे भारतासाठी पदार्पण करतील.
श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल , ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन, संजू सैमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, दीपक चाहर और चेतन सकारिया.
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या चेंडूवर फलंदाजाने गुडघ्यावर बसत खेचला चौकार, मग गोलंदाजाने चिडून केलं असं काही
व्हीव्हीएस लक्ष्मणने रोहित शर्माला दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘या’ गोलंदाजापासून सावधान