भारतीय संघ टी20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया इतिहास रचला आहे. भारतीय संघ तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा टी20 विश्वविजेता ठरला आहे. 2007 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीमध्येच ट्राॅफी जिंकली होती. यंदाच्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2024 टी ट्राॅफी आपल्या नावे केले आहे.
टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी मात्र काही दिवस वाट पाहावी लागली. बार्बाडोसमध्ये बेरिल चक्रीवादळामुळे खेळाडूंना परतता येत नव्हते. बार्बाडोसमध्ये हे खेळाडू 3 दिवस अडकून पडले होते. त्याच्यासोबत बीसीसीआय सचिन जय शाह, कोचिंग स्टाफ आणि काही पत्रकार बार्बाडोसमध्ये होते.
बीसीसीआयने पाठवलेले विशेष एअर इंडियाचे विमान खेळाडूंना आणण्यासाठी बार्बाडोसला पोहोचले. आता विमानाने उड्डाण केले आहे आणि खेळाडू मायदेशी परतत आहेत. कर्णधार रोहित शर्माने फ्लाइटमधील पहिला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, ‘घरी येत आहे.’ रोहितने सूर्यकुमार यादवसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. खेळाडूंना आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान बार्बाडोसला पोहोचले होते.
भारतीय संघाचे विमान सध्या ताशी 950 किमी वेगाने उड्डाण करत आहे. वेग सतत बदलत राहील. टीम इंडिया गुरुवारी पहाटे 3 ते 4 च्या सुमारास दिल्लीला पोहोचेल. त्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकतात. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईतील खुल्या बस परेडमध्ये दिसू शकतात.
SCHEDULE FOR INDIAN TEAM TOMORROW. [Express Sports]
– Landing in Delhi.
– Breakfast with Prime Minister.
– Travelling to Mumbai.
– Victory Parade from Nariman Point to Wankhede stadium on an open bus.
– 125 Crore Prize money will be distributed by Jay Shah to the team. pic.twitter.com/Ua3ktoUS7L— Johns. (@CricCrazyJohns) July 3, 2024
भारतीय संघाचे उद्याचे (4 जुलै) वेळापत्रक
– दिल्लीत लँडिंग (पहाटे 4-5 वाजताच्या दरम्यान)
– पंतप्रधानांसोबत नाश्ता ( सकाळी 11 वाजताच्या दरम्यान)
– मुंबईचा प्रवास
– नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसने विजय परेड
– 125 कोटींची बक्षीस रक्कम जय शाह संघाला वितरित करतील
भारतीय संघ मोदींची भेट घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. तर दुपारी चार वाजताच्या दरम्यान टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसने विजय परेड होईल. त्यानंतर बीसीसीआयने झाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचे बक्षीस रक्कम जय शाह संघाला वितरित करतील.
महत्तवाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड लढत आज! पीटरसन, युवराज अन् हरभजन सारखे दिगग्ज दिसतील ॲक्शनमध्ये; कधी आणि कुठे पाहता येणार सामना? कमबॅक असावा तर असा! हार्दिक पांड्याचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
तरुण वयात पडले मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात! खूपच रंजक आहे राहुल द्रविड यांची लव्ह स्टोरी