Loading...

टीम इंडियाची ८७ वर्षीय ‘सुपर फॅन’ चारुलता पटेल यांचे निधन

भारतीय क्रिकेट संघाची सुपर फॅन चारुलता पटेल यांचे सोमवारी(13 जानेवारी) वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. चारुलता पटेल या मागीलवर्षी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.

Loading...

त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की ‘जड अंतकरणाने तूम्हाला माहिती देत आहोत की आमच्या आजीने 13 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजता शेवटचा श्वास घेतला. ती खूप प्रेमळ होती.’

‘खरं आहे की चांगल्या गोष्टी छोट्या कालावधीसाठी येतात. आजी आमचे जग होती. मला तूम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत की मागीलवर्षी तिच्याकडे ज्याप्रकारे लक्ष वेधले गेले ते तिला आवडले आणि तिला ते खास वाटले.’

चारुलता पटेल यांच्या निधनानंतर बीसीसीआय आणि आयसीसीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. बीसीसीआयने पोस्टमध्ये लिहिले आहे की ‘भारतीय संघाची सुपर फॅन चारुलता पटेल जी यांच्या आठवणी नेहमी आमच्या हृदयात राहतील. त्यांचे क्रिकेटसाठी असणारे प्रेम आम्हाला प्रेरणा देत राहिल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

Loading...

2019 विश्वचषकादरम्यान चारुलता पटेल यांना भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी भेट दिली होती. या भेटीदरम्यानचे व्हिडिओ आणि फोटोंची मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Loading...

या सामन्यानंतरच्या भारताच्या सर्व सामन्यांची तिकीटेही विराटने चारुलता यांना उपलब्ध करुन दिली होती.

You might also like
Loading...