भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन-डे मालिकेला शुक्रवारी म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ह्या मालिकेची सुरुवात सिडनी क्रिकेट मैदानात होणार्या सामन्याने होईल. ह्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ सराव करत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. व्हिडिओत भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजीचा जोरदार सराव करताना दिसून येत आहे.
बीसीसीआयने ह्या व्हिडिओला ‘Timing them to perfection’ असं कॅप्शन देत भारतीय कर्णधार लयीत आल्याचे संकेत दिले आहेत. नेटमध्ये सराव करताना विराटने जोरदार चेंडू टोलवत आगामी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
Timing them to perfection! 👌👌#TeamIndia skipper @imVkohli getting batting ready ahead of the first ODI against Australia 💪🏻🔝 #AUSvIND pic.twitter.com/lG1EPoHVKK
— BCCI (@BCCI) November 26, 2020
विराटच्या खांद्यावर असेल संघाची मदार
आयपीएलच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी उपलब्ध नसेल. अशावेळी संघाचा भार उचलण्याची जबाबदारी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर आहे. एकहाती सामना जिंकवून देण्याची क्षमता बाळगणारा विराट कोहली आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आगामी मालिकेत विराट कोहली आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करून संघाची नौका ‘पैलतीरी’ नेतो का, ह्याकडे क्रिकेट जगताचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज