टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळताना अनेक संघ खूप कमी फरकाने जिंकतात. असे एकदा नाही, तर अनेकदा होते. यामुळे त्यांच्या नावावर खास कारनाम्याची नोंद होते. असेच काहीसे आता भारतीय संघासोबतही घडले. टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला आणि उपांत्य सामन्यातील जागा जवळपास पक्की केली आहे. या सामन्यासाठी भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चला तर भारताच्या नावावर झालेल्या खास कारनाम्याबद्दल जाणून घेऊया…
भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याची 11 धावांवर विकेट गमावली. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) याने अर्धशतक झळकावत भारताच्या धावसंख्येत भर घातली. त्याच्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) यानेही नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला 6 विकेट्स गमावत 184 धावांचा पल्ला गाठण्यास मदत केली. हे आव्हान पार करताना बांगलादेशच्या डावामध्ये पावसाने हजेरी लावली आणि सामन्याचा कायापालट झाला. बांगलादेशचे आव्हान थेट 185वरून 151वर आले. मात्र, तरीही त्यांना हा सामना जिंकता आला नाही. हा सामना भारताने 5 धावांच्या कमी फरकाने जिंकला. यासह भारताने एक कारनामा केला.
भारताचा कारनामा
या विजयासह भारतीय संघाने टी20 विश्वचषकात एका संघाविरुद्ध अनेकदा 5 किंवा त्यापेक्षा कमी धावांनी विजय मिळवण्याची कामगिरी केली. यापूर्वी भारताने बांगलादेशविरुद्धच 2016च्या टी20 विश्वचषकात 1 धावेने विजय मिळवला होता.
.@imVkohli bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Bangladesh in Adelaide. 👌 👌
Scorecard ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ#T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/R5Qsl1nWmf
— BCCI (@BCCI) November 2, 2022
भारताव्यतिरिक्त हा कारनामा दक्षिण आफ्रिका संघाने केला होता. दक्षिण आफ्रिका संघाने सर्वप्रथम 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने विजय मिळवला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच 5 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने 2014मध्ये 2 धावांनी विजय मिळवला होता.
टी20 विश्वचषकात एका संघाविरुद्ध अनेकदा 5 किंवा त्याहून कमी धावांनी सामना जिंकणारे संघ
दक्षिण आफ्रिका
विरुद्ध न्यूझीलंड- 1 धावेने विजय (2009)
विरुद्ध न्यूझीलंड- 2 धावांनी विजय (2014)
भारत
विरुद्ध बांगलादेश- 1 धावेने विजय (2016)
विरुद्ध बांगलादेश- 5 धावांनी विजय (2022)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानला दणका! वाचा नक्की कसे झाले नुकसान
शाब्बास रे वाघांनो! थरारक सामन्यात बांगलादेशला धूळ चारत टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये