वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्धणार रोहित शर्मा अनुपस्थित असल्यामुळे शिखर धवन संघाचा कर्धणार बनला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात पाय टाकताच धवन या वर्षातील भारताचा सातवा कर्णधार ठरेल. त्याचसोबत भारत एका वर्षात सात कर्णधार बनदलणारा दुसरा संघ देखील ठरेल. यापूर्वी श्रीलंकन संघाने अशी कामगिरी केली होती. तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने देखील एका वर्षात सहा-सहा कर्णधार बदलले आहेत. आपण या लेखात एका वर्षात सर्वाधिक कर्णधारांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अशाच काही संघांची माहिती घेणार आहोत.
१. भारत –
यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये भारतीय संघाने त्यांचा पहिला सामना केएल राहुलच्या नेतृत्वात खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे खेळला नाव्हता आणि राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. पुढच्या सामन्यात विराटने पुनरागमन केले, पण एका सामन्यात नेतृत्व केल्यानंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. एकदिवसीय मालिकेत केएल राहुलनेच नेतृत्व केले. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि श्रीलंका दौऱ्यात रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले.
आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पुन्हा केएल राहुलला कर्णधार बनवले गेले होते, पण दुखापतीमुळे त्याने मालिकेतून माघार घेतली आणि रिषभ पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिक पंड्याने संघाचे नेतृत्व केले. पंड्या यावर्षाचा भारताचा पाचवा कर्णधार होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने नेतृत्व केले. अशात आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत कर्णधाराची भूमिका पार पाडणारा धवन यावर्षीचा भारताचा सातवा कर्णधार आहे.
२. श्रीलंका –
श्रीलंका पहिला असा संघ आहे, ज्यांनी एका वर्षात सात कर्णधार बदलले. २०१७ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एंजेलो मॅथ्यूज श्रीलंकन संघाचा कर्णधार होता. दोन कसोटी आणि दोन टी-२० सामन्यात नेतृत्व केल्यानंतर मॅथ्यूजचे हॅमस्ट्रींग दुखावले गेले. त्यानंतरच्या टी-२० मालिकेत दिनेश चंदिमल आणि एकदिवसीय मालिकेत उपुल थरंगाने संघाचे नेतृत्व केले. तसेच कसोटी संघाचे नेतृत्व रंगना हेराथने केले होते.
दुखापतीतून सावरल्यानंतर मॅथ्यूज पुन्हा कर्णधार बनला, पण संघाने मायदेशात जिम्बाब्वेविरुद्धची मालिका गमावली आणि त्याने कर्णधारपद सोडले. त्यानंतर लसिथ मलिंगा आणि चमारा कपुगेदरा यांनी श्रीलंकन संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर संघाने पाकिस्तान दौरा केला आणि वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यात विश्रांती मिळाली होती. अशात थिसारा परेराला संघाचा कर्णधार बनवले गेले होते. परेला २०१७ मध्ये श्रीलंकेचे नेतृत्व करणारा सातवा खेळाडू बनला होता.
३. जिम्बाब्वे –
जिम्बाब्वे संघाने देखी एका वर्षात सहा कर्णधार बदलले आहेत. २००१ मध्ये सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये हेथ स्ट्रेक संघाचा कर्णधार होता. त्यानंतर संघ वादामध्ये अडकला आणि ग्रांट फ्लॉवरने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्धणाराची भूमिका पार पाडली. त्यानंतर गाय विटलने संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर ब्राथन मर्फी, एलिएस्टर कॅपबेल आणि स्टुअर्ट कार्लिसले यांनीही जिम्बाब्वेचे नेतृत्व केले आहे.
४. इंग्लंड –
साल २०११ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऍशेस मालिका जिंकली. त्यावेळी एंड्यू स्ट्रॉस संघाचा कर्णधार होता. तसेच टी-२० मध्ये पॉल कलिंगवुड संघाचे नेतृत्व करत होते. परंतु २०११ विश्वचषकात इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पोहचू शकला नाही आणि स्ट्रॉसने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच निवडकर्त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय प्रकारासाठी वेगवेगळे कर्णधार बनवण्यास सुरुवात केली. एलिएस्टर कुकला एकदिवसीय आणि स्टुअर्ट ब्रॉडला टी-२० संघाचा कर्णधार बनवले गेले. त्यानंतर ओएन मॉर्गन आणि ग्रीम स्वान यांनीही संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली होती.
५. ऑस्ट्रेलिया –
मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ च्या सुरुवातील टिम पेन ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करत होता, पण काही कारणास्तव तो वादात सापडला आणि त्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पॅट कमिन्सच्या खांद्यावर आली. कर्णधार बनल्यानंतर कमिन्सला कोरोनाची लागण झाली आणि स्टीव स्मिथ पुन्हा एकदा कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये एरॉन फिंचच्या अनुपस्थितीत एलेक्स कॅरीने संघाचे नेतृत्व केले. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत मॅथ्यू वेड संघाचा कर्णधार होता. परंतु टी-२० विश्वचषकात फिंचने कर्धणारची जबाबादीर स्वीकारली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
WIvIND: ‘या’ भारतीयांनी सर्वाधिक कॅरेबियन फलंदाजांना दाखवलाय तंबूचा रस्ता; दिग्गजांसह युवाही सामील
वेस्ट इंडीजच्या प्रशिक्षकांनी केला रणनीतीचा खुलासा, फलंदाजी आणि गोलंदाजीत ‘हे’ असेल टार्गेट
बीसीसीआयचे ८६.२१ कोटी देण्यास बायजूसचा नकार?, पेटीएमही सोडणार स्पॉन्सरशिप, वाचा संपूर्ण प्रकरण





