---Advertisement---

अश्रूंचे झाले करोडो! मेस्सीने डोळे पुसलेल्या टिश्यू पेपरची बोली गेली ‘इतक्या’ कोटींमध्ये

---Advertisement---

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याने काही दिवसांपूर्वीच गेली २१ वर्ष स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनासोबत असलेले आपले नाते तोडले होते. यानंतर त्याने फ्रान्समधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मनशी (पीएसजी) करार केला. बार्सिलोना क्लब सोडताना मेस्सी कमालीचा भावूक झालेला. त्या निरोप समारंभात मेस्सी धाय मोकलून करताना दिसला होता. आता तेच अश्रू ज्या टिश्यू पेपरने पुसले गेले होते, त्या टिश्यू पेपरचा लिलाव करोडो रुपयांना केला जात आहे.

त्या टिश्यू पेपरचा होणार लिलाव
बार्सिलोना फुटबॉल क्लब सोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर निरोप समारंभात मेस्सी रडताना दिसला होता. त्यावेळी अश्रू पुसण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला टिश्यू पेपर दिले होते. मेस्सीने वापरलेल्या त्या टिश्यू पेपरचा आता लिलाव होत आहे.

अर्जेंटिनामधील वृत्तपत्रांच्या बातमीनुसार, ‘एका अज्ञात व्यक्तीने असा दावा केला आहे की, मी मेस्सीने अश्रू पुसलेले टिश्यू पेपर गोळा केले आहेत. त्याने या टिश्यू पेपरची ऑनलाइन विक्री करण्याची रीतसर जाहिरात दिली होती. आत्तापर्यंत या टिश्यू पेपरची बोली ७.४३ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. त्याने दावा केला आहे की, या अश्रूंमध्ये मेस्सीची जनुके असल्याने त्याद्वारे मुलदेखील जन्माला घातले जाऊ शकते.’
यापूर्वी मेस्सीने बार्सिलोनासाठी घातलेल्या जर्सी आणि रिप्लिका यांचादेखील लिलाव करण्यात आला होता.

बार्सिलोनासाठी दिली २१ वर्ष
लिओनेल मेस्सी वयाच्या १३ व्या वर्षी बार्सिलोना फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला होता. त्यानंतर त्याने क्लबसाठी ५२० सामने खेळताना ४७४ गोल केले आहेत. यादरम्यान त्याने बार्सिलोनाला सर्व प्रमुख फुटबॉल स्पर्धांची विजेतेपदे मिळवून दिली. नुकत्याच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत त्याने अर्जेंटिनाचे नेतृत्व करताना संघाला विजयी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

मेस्सीने बाल्कनीत भारतीय चाहत्याचे स्वीकारले अभिवादन ; व्हिडिओ तुफान व्हायरल

दोन वर्षांचा चिमुकला लाईव्ह सामन्यात घुसला अन् घडलं असं काही; व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

काळीज तोडणारा क्षण! बार्सिलोना क्लबचा निरोप घेताना मेस्सीला अश्रू अनावर, खूप रडला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---