---Advertisement---

क्या बात है ! रस्ता चुकलेल्या सचिनचा रिक्षावाल्यासोबत थेट मराठीत संवाद; तो ही म्हणाला, ‘मला फॉलो करा’

---Advertisement---

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत येत असतो. कधी तो त्याच्या क्रिकेटमधील विविध विषयांवरील प्रतिक्रियांमुळे, कधीतरी त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केलेल्या एखाद्या शानदार खेळीची आठवण म्हणून, तर कधी त्याच्या फोटो, व्हिडिओमुळे तो चर्चेत असतो. नुकताच त्याचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका रिक्षाचालकाशी मराठीत बोलताना दिसतो.

जानेवारी २०२० मधील असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की सचिन मुंबईमध्ये रस्ता चुकला आहे आणि त्याचवेळी एका रिक्षाचालकाने त्याला ओळखले. त्यामुळे त्याने सचिनला त्याच्या मागोमाग येण्यास सांगितले.

खरंतर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने काही रस्ते वन वे करण्यात आले आहेत. त्यामुळे सचिनला योग्य रस्ता मिळत नसल्याने तो त्या रिक्षाचालकाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या रिक्षाच्या मागे जात आहे, असे सचिन व्हिडिओमधून सांगतो.

तसेच सचिन कांदिवली पूर्वमध्ये रस्ता चुकला असल्याचेही या व्हिडिओतून कळते. यावेळी त्याने त्या रिक्षाचालकाशी मराठीतून संवाद साधला. तसेच सचिनने त्या रिक्षाचालकाला त्याचे नाव विचारले आणि त्याची विचारपूसही केली. त्या रिक्षाचालकाचे नाव मंगेश फडतरे असे आहे. यावेळी मंगेश सचिनला हायवेपर्यंत सोडतो असेही सांगतो.

मंगेशने सचिनशी संवाद साधताना असेही सांगितले की त्याची मुलगी सचिनची मोठी चाहती आहे. त्यावर सचिनने तिलाही हॅलो सांगा, असे सांगितले. मंगेशने सचिनला हायवेपर्यंत पोहचवण्यात मदत केल्यानंतर त्याने सचिनबरोबर एक सेल्फीही काढला. यावेळी सचिनने त्याच्यातील सभ्यतेचे दर्शन देत मंगेशला मागून येणाऱ्या गाड्यांकडे लक्ष द्या, सांभाळून राहा असेही सांगितले.

तसेच सचिनने मंगेशचे आभार मानले आणि आपल्या मार्गाने तो पुढे गेला. पुढे जाताना सचिनने अशीही कबुली दिली की त्याला एकट्याला हा रस्ता सापडला नसता.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारीच! विराट कोहली बनू शकतो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू

काय सांगता ! आपला झहीर खान होणार आमदार ?

भारतात क्रिकेटला पुन्हा सुरुवात! पहिल्याच सामन्याच मनोज तिवारी चमकला

ट्रेंडिंग लेख –

विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक

‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी; वाचा तिच्याबद्दल १० मनोरंजक गोष्टी

क्रिकेट इतिहासातील ३ सर्वात वादग्रस्त पंच, ज्यांचा पाकिस्तानशी आहे संबंध

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---