भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. सचिनच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून अनेक विक्रम आहेत. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सचिनने फक्त एकदाच सलामीला फलंदाजी केली आहे.
सचिनने (Sachin Tendulkar) आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १९८९ पासून केली. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत (Test Career) एकूण २०० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये सचिनने फक्त एकदा सलामीला फलंदाजी केली होती. त्याने १९९९मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या (INdia vs New Zealand) कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी (Opening Batting) केली होती.
यामध्ये २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान खेळलेल्या कसोटी सामन्यात सचिनने पहिल्या डावात कर्णधार म्हणून ४ थ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. यावेळी त्याने २१७ धावा केल्या होत्या. यामध्ये २९ चौकारांचा समावेश होता.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात सचिनने सलामीला फलंदाजी केली होती. जेणेकरून भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळेल. परंतु यावेळी सचिनने १०चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने केवळ १५ धावाच केल्या होत्या.
त्याचबरोबर सचिनने आपल्या कसोटी कारकीर्दीत तिसऱ्या क्रमांकावर एकदाही फलंदाजी केली नाही.
विशेष म्हणजे भारतीय संघाकडून तब्बल ८९ खेळाडूंनी कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. यातील १९ फलंदाजांनी १ हजारपेक्षा जास्त धावा केल्या. तर १२ खेळाडूंना ३० किंवा अधिक कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. सुनिल गावसकर यांनी तब्बल ११९ भारताकडून सलामीला फलंदाजी केली.
वनडे क्रिकेटमध्ये सचिनने ३४४ सामन्यात सलामीला फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १०० शतके पूर्ण करण्याचा विक्रम आहे. यामध्ये त्याने वनडेत ४९ आणि कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके केली आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
–व्यक्ती विशेष- ग्लूसेस्टरचा शेतकरी अॅलेस्टर कूक
-क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन
-रोहित शर्माने ३ शतकं केलेलं मैदान झालं कोरोना टेस्टचं सेंटर