जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी (IPL 2022) बेंगलोर येथे मेगा लिलाव (IPL Mega Auction) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यवधींची रक्कम मिळाली. तर, अनेक दिग्गजांना कोणीही बोली लावली नाही. यासोबतच काही असेदेखील खेळाडू राहिले, ज्यांना कोणीही ओळखत नव्हते मात्र त्यांना करार भेटले. असाच एक खेळाडू रमेश कुमार (Ramesh Kumar) ठरला. ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने केवळ २० लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेते. हा रमेश कुमार (Ramesh Kumar KKR) कोण आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.
रमेश कुमार हा कोणीही व्यवसायिक क्रिकेटपटू नाही. रमेश कुमार हा पंजाबमध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळतो. टेनिस बॉल क्रिकेटपटू म्हणून त्याचे पंजाबमध्ये मोठे नाव आहे. त्याचे खरे नाव रमेश कुमार असले तरी तो ‘नरीन जलालाबादी’ या नावाने ओळखला जातो. डावखुऱ्या हाताचा तडाखेबाज फलंदाज असलेला रमेश यापूर्वी कधीही सिजन बॉल क्रिकेट खेळला नाही. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ट्रायलसाठी बोलावले होते. तो आक्रमक फलंदाजीसह वेगवान गोलंदाजी देखील करतो. मात्र, कोलकाता केवळ त्याला फलंदाज म्हणून संधी देणार असल्याचे सांगत आहे. रमेश कुमार याच्यानावे १० चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम जमा आहे.
मेगा लिलावात कोलकाता संघाने भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरवर १२ कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तोच संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा गोलंदाजीचे नेतृत्व करताना कोलकाता संघाने आयपीएल रिटेन्शनमध्ये आंद्रे रसेल, सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर व वरून चक्रवर्ती यांना रिटेन केले होते. प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री जुही चावला हे या संघाचे संघमालक आहेत. कोलकाता संघाने २०१२ व २०१४ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तर, मागील वर्षी संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला.
महत्वाच्या बातम्या-
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा (mahasports.in)
स्टीव्ह स्मिथचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहून सर्वच झाले आश्चर्यचकित, पाहा व्हिडिओ (mahasports.in)