---Advertisement---

IND vs AUS । जसप्रीत बुमराहचा जुना फॉर्म! घातक यॉर्कर टाकून उडवला मॅक्सवेलचा त्रिफळा

On: बुधवार, सप्टेंबर 27, 2023 5:12 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ऑगस्ट महिन्यात मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले. त्याआधी जवळपास 10 महिन्यांपेक्षा जास्त काळ बुमराहन दुखापतीमुळे खेळला नव्हता. पुनरागमनानंतर आठवा सामना जसप्रीत बुमराह याने बुधवारी (27 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. मोठ्या काळानंतर बुमराहने आपल्या खास शैलीत यॉर्कर टाकून समोरच्या फलंदाजाचा त्रिफळा उडवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वनडे मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी राजकोटमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी वरच्या फळीतील फलंदाजांनी अप्रतिम खेळी केली. ग्लेन मॅक्सनवेल () याच्यासाठी हा मालिकेतील पहिला सामना होता. पण अष्टपैलू खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. जसप्रीत बुमराह याने 39व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला.

भारताला मिळालेली ही सामन्यातील पाचवी आणि महत्वाची विकेट होती. तसेच बुमराहची या सामन्यातील दुसरी विकेट ठरली. त्याआधी बुमराहने यष्टीरक्षक ऍलेक्स केरी याला तंबूत धाडले होते. (Terrific delivery by Jasprit Bumrah to clean up Glenn Maxwell)

तिसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा

ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड

महत्वाच्या बातम्या – 
घामाघून झालेल्या स्मिथने मागवली खुर्ची, पण विराटला सुचली कांगारु फलंदाजांसोबत मस्करी, व्हिडिओ पाहाच
मिचेल मार्श आणि शतकामध्ये भिंत बनला कुलदीप! सलामीवीर फलंदाज ‘नर्व्हस नाईंटी’वर बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---