भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे जगभरात अनेक चाहते पहायला मिळतात. तो जेव्हाही कुठे जातो तेव्हा त्याचे चाहत्यांकडून उत्साहात स्वागत होत असते. असेच स्वागत त्याचे विशाखापट्टणम येथेही झाले आहे.
विशाखापट्टणमला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 24 फेब्रुवारीला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी धोनी विशाखापट्टणमला पोहचला आहे.
तो जेव्हा विमानतळावरुन बाहेर पडलेला चाहत्यांना दिसला तसे चाहत्यांनी त्याच्या नावाचा गजर सुरु केला. त्यामुळे लगेचच सुरक्षारक्षकांनी त्याला तेथून कारपर्यंत मार्ग काढून देत चाहत्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/BuJqLvrhvMr/
याआधीही या महिन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यात धोनी जेव्हाही मैदानात उतरला तेव्हा त्याला चाहत्यांनी उभे राहत टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले होते.
धोनीचा फॉर्म मागीलवर्षी खराब असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागले होते. पण यावर्षी मात्र त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावून टिकाकारांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.
आता ऑस्ट्रेलिया संघ टी20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या मालिकेदरम्यान धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
मे मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघाच्या या शेवटच्या आंतरराष्ट्रीय मालिका आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी या मालिका अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी20 सामना 24 फेब्रुवारीला विशाखापट्टणमला तर दुसरा सामना 27 फेब्रुवारीला बंगळूरु येथे होणार आहे. यानंतर 2 मार्चपासून 5 सामन्यांची वनडे मालिका पार पडेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी तब्बल ४ लाख अर्ज
–सिक्सर किंग ख्रिस गेलने केले विश्वविक्रम, रोहित, आफ्रिदी यांनीही टाकले मागे
–मुंबईकर श्रेयस अय्यरचा टी२०मध्ये कहर कारनामा