टी20 विश्वचषक 2022 सुरू होण्याधीच भारतीय पुरूष क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांची चिंता सतावत असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून (T20 World Cup)बाहेर झाला आहे. सध्यातरी या वृत्तेबाबत अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. तर त्याच्याआधी अष्टपैलू रविंद्र जडेजा टी20 विश्वचशषकातून बाहेर झाला आहे.
पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला खेळणे अशक्य असल्याने त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तो तब्बल सहा महिने संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे.
बुमराह विश्वचषकाआधी गंभीर जखमी झाला आणि तो स्पर्धेबाहेर पडल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयावर प्रश्न निर्माण केले जात आहेत. आशिया चषक 2022आधी बुमराहचे पाठीचे दुखणे समोर आले होते. यामुळे तो संपूर्ण स्पर्धेलाच मुकला होता. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत खेळला जी आशिया चषकानंतर खेळली गेली. यामुळे सामना खेळण्याच्या नादात बुमराहला अधिक विश्रांती मिळाली नसल्याने त्याला दुखापतीतून सावरण्याचीही संधी मिळाली नाही. तो पूर्णपणे फिट नसून सुद्धा त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवले गेले. जे संघासाठी आता महाग ठरले आहे. अशी चिंता व्यक्त केली जात आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात बुमराह खेळला नाही. दुसऱ्या सामन्यात 2 षटके आणि शेवटच्या सामन्यात 4 षटके टाकताना तो लयीत दिसला नाही. त्यालाही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धुतले. या मालिकेतील शेवटच्या सामन्यातील 4 षटकात त्याने 50 धावा दिल्या, ज्या त्याच्या टी20मधील सर्वाधिक धावा ठरल्या. तसेच तो तिरूअनंतपुरम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही खेळला नाही. त्याला पाठीचा त्रास जाणवू लागल्याने तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही, असे ट्वीट बीसीसीआयने केले होते.
बुहराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांच्यावर जबाबदारी असणार आहे. कारण भुवनेश्वर कुमार याचीही डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी काळजीचे कारण बनली आहे. तसेच बुमराहच्या टी20 विश्वचषकाच्या बाहेर जाण्याचे वृत्त बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीच्या टेंशनमध्ये वाढ, कोणते पर्याय आहेत संघाकडे?
ठरलं तर! 7 ऑक्टोबरला पुन्हा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच, जाणून घ्या कुठे आणि कधी खेळणार संघ
INDvSA: नवीन चेंडूने अर्शदीपचा कहर, स्वत:च सांगितले भन्नाट गोलंदाजीचे रहस्य






