भारताचा पुरुष हॉकी संघ सध्या चर्चेत आहे. कारण त्यांनी गुरुवारी (5 ऑगस्ट) मिळवलेले यश हे अभूतपूर्व आहे. गेल्या 41 वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ त्यांनी या टोकियोमध्ये संपवला आहे. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीला 5-4 अशी धूळ चारली आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरले. गोलरक्षक पीआर श्रीजेशने भारताच्या या नेत्रदीपक विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.
जर्मनीविरुद्धच्या सामन्यात पीआर श्रीजेशने काही उत्तम बचाव केले, याशिवाय संपूर्ण स्पर्धेदरम्यान देखील त्याने काही आश्चर्यकारक गोलरक्षणाचे नमुने देखील सादर केले. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजमाध्यमावर याबाबत त्याचे कौतुक होताना दिसत आहे. पीआर श्रीजेश भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा चाहता आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे.
प्रसिद्धी पासून दूर राहणाऱ्या या खेळाडूने काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या संघाला टॅग करत ट्विट केले होते. ज्यात त्याने म्हटले होते की ‘धोनी मला आवडतो म्हणून सीएसकेचा संघ आवडतो. सीएसकेने ट्विटला उत्तर देत म्हटले होते, धोनी यष्टीरक्षक देखील आहे. यावर श्रीजेशने उत्तर देत लिहिले होते, ‘थलायवा’.
@ChennaiIPL .. I like @msdhoni so definitely chennai 💪🙏
— sreejesh p r (@16Sreejesh) April 28, 2020
Talivaaaa 😎😎😎😎😎
— sreejesh p r (@16Sreejesh) April 28, 2020
श्रीजेश 2016 मध्ये भारतीय हॉकी संघाचा कर्णधार देखील होता. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली हॉकी संघ आशियाई चॅम्पियन बनला होता. त्या काळात उरीमध्ये दहशतवादी हल्लाही झाला होता, ज्यामुळे संपूर्ण देश दु: खी होता. श्रीजेशने टीम इंडियाचा तो विजय हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित करून चाहत्यांची मने जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: आवडत्या शॉटनेच केला रोहितचा घात, ‘असा’ झाला ३६ धावांवर बाद
“टीम इंडियाने कसोटी चॅम्पियशीप फायनलमधील चूका सुधारल्या”, माजी दिग्गज वेगवान गोलंदाजांवर खूश
ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजयानंतर गोलपोस्टवर का बसला श्रीजेश? स्वत:च केलाय खुलासा