बीपीसीएल यांच्या वतीने आयोजित व पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 43व्या पीएसपीबी आंतर युनिट गोल्फ स्पर्धेत शुभांकर सेन, शौर्य भट्टाचार्य, मिलिंद सोनी, अर्जुन सिंग भाटिया, जस्जित सिंग, गगन वर्मा, सिमरजीत सिंग, विनम्र आनंद, सुखमन सिंग हे भारतातील अव्वल हौशी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.ही स्पर्धा 5 ते 6 एप्रिल 2023 पूना क्लब गोल्फ कोर्स, येरवडा, या ठिकाणी होणार आहे.
स्पर्धेत ऑईल पीएसयु, एचपीसीएल, जीएआयएल, आयओसीएल, ओआयएल, ईआयएल, ओएनजीसी, सीपीसीएल आणि बीपीसीएल या संघांनी आपला सहभाग नोंदवला असुन अव्वल खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धा चुरशीची होणार आहे. प्रमुख पाहुणे बीपीसीएलच्या रिफायनरी विभागाचे संचालक संजय खन्ना यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
स्पर्धेचे अंतिम सामने 6 एप्रिल 2023 रोजी होणार असुन त्यानंतर स्पर्धेचे पारितोषीक वितरण होणार आहे. पीएसपीबी यांच्यावतीने सदस्य समितीच्या सहकार्याने गेल्या चार दशकांपासून देशांतील विविध क्रीडा प्रकारांचा प्रचार व विकासासाठी विविध स्तरावर क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश मिळवून देशाची मान उंचावणारे अनेक खेळाडू या स्पर्धांमधून पुढे येत असतात. त्यांतील पुण्यात होणाऱ्या गोल्फ स्पर्धेच्या माध्यमातून अव्वल हौशी खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी तसेच देशांतील सर्वोत्तम गोल्ड पटूशी स्पर्धा करण्यासाठी संधी व प्रोत्साहन मिळवून दिले जाते.
(The 43rd PSPB Inter-Unit Golf Tournament organized by BPSL will start from April 4)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंच नितीन मेननचं स्वप्न खरं होणार! पहिल्यांदाच करणार ‘या’ महत्वाच्या मालिकेत अंपायरिंग
अविस्मरणीय खेळी: गांगुलीने ‘तो’ निर्णय घेतला अन् धोनीने पहिलं-वहिलं शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं