भारतात कोरोना व्हायरसचे संकट वाढतच चालले आहे. रोज लाखोंमध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्याच वैद्यकिय सुविधांचा तुटवडा जाणवत आहेत. रोज हजारांमध्ये मृत्यू होत आहेत. असे असताना अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या लोकांसाठी सीमा बंद केल्या आहेत. यात ऑस्ट्रेलिया हा देश देखील आहे. मात्र, यामुळे सध्या इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने मंगळवारपासून १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांसाठी सीमाबंदी केली आहे. आता ९न्यूज ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया भारतातून येणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार करत आहे. देशाच्या बायोसिक्यूरिटी ऍक्टनुसार हा निर्णय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांचे मंत्रिमंडळ घेण्याची शक्यता आहे.
या नियमानुसार भारतात २ आठवडे घालवून परत येणाऱ्या नागरिकांना ५ वर्षांसाठी जेलची शिक्षा होऊ शकते किंवा ६६,००० ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास ३८ लाख रुपये) दंड होऊ शकतो.
दरम्यान, एबीसी न्यूजने वृत्त दिले आहे की ऑस्ट्रेलियाने भारतातून डोहा, सिंगापूर आणि क्वालालंपूरमार्गे ऑस्ट्रेलियाला पोहचण्याचे मार्गही बंद केले आहेत. विशेष म्हणजे हा निर्णय होण्याच्या काहीवेळापूर्वीच आयपीएलमधून माघार घेतलेले ऍडम झम्पा आणि केन रिचर्डसन हे दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कतार एअरनवेजच्या फ्लाईटने ऑस्ट्रेलियात पोहचले. त्यामुळे त्यांना या नियमाचा फटका बसला नाही. तसेच काहीदिवसांपूर्वीच अँड्र्यू टाय हा ऑस्ट्रेलियाला पोहचला होता.
आता जर ऑस्ट्रेलिया सरकारने नियम अधिकच कडक केले, तर त्याचा फटका आयपीएल खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना बसू शकतो.
For the first time in our history, it will be a criminal offence for some Australians to come home from overseas.
Within the next 48 hours returning citizens will be threatened with five years jail if they've been in India in the past two weeks. @CUhlmann #COVID19 #9News pic.twitter.com/lS6KS62ac0
— 9News Australia (@9NewsAUS) April 30, 2021
बीसीसीआयची भूमीका
खरंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की क्रिकेटपटूंना वेगळी कोणतीही सूट दिली जाणार नाही. पण त्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडू सुखरुप घरी पोहचण्याची व्यवस्था करु असे अश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्यातरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळणे कायम केले आहे.
मॅक्सवेलने सुचवला दुसरा मार्ग
सध्याची परिस्थिती पाहाता, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मॅक्सवेलने म्हटले आहे की आयपीएलचा १४ वा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यासह ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू इंग्लंडला जाऊ शकतात. त्यानंतर तिथून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा मार्ग शोधला जाऊ शकतो.
सध्या ऑयपीएलमध्ये स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, ख्रिस लिन असे अनेक दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आला शिखर धवन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राजस्थानच्या आणखी एका खेळाडूने केले मोठे मन, कोविड रुग्णासाठी केली इतकी मदत
“मला देखील संपूर्ण कारकिर्दीत हे जमले नाही”, दिग्गजाने केली पृथ्वी शॉची प्रशंसा