ऑस्ट्रेलियाचा टी20 विश्वचषक विजेता यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2021 मध्ये पहिल्यांदाच संघाला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियासाठी 13 वर्षे क्रिकेट खेळला आहे. त्याला 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. मात्र आता या 36 वर्षीय क्रिकेटपटूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. मॅथ्यू वेडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मर्यादित फाॅरमॅटच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत.
मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियासाठी तीन टी20 विश्वचषक खेळले. त्यापैकी संघाने 2021 चा टी20 विश्वचषक जिंकला. दुबईत जिंकलेले हे संघाचे पहिले विजेतेपद होते. तसेच त्यावेळी तो संघाचा उपकर्णधार होता. उपांत्य फेरीत त्याने पाकिस्तानविरुद्ध 17 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या आणि संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले. मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियासाठी एकूण 36 कसोटी सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 117 होती. जी ऍशेसमध्ये आली. मॅथ्यू वेड अजूनही देशांतर्गत क्रिकेटमधील टी20 लीग क्रिकेटमध्ये सक्रिय असेल.
36 Test matches. 97 ODIs. 92 T20 Internationals.
Congratulations to Matthew Wade on an outstanding international cricket career! pic.twitter.com/SDWl1OhqZC
— Cricket Australia (@CricketAus) October 29, 2024
मॅथ्यू वेडला ऑस्ट्रेलियाच्या कोचिंग स्टाफमध्ये थेट स्थान मिळाले आहे. पुढच्या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेत तो संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये उपस्थित राहणार आहे. वेड त्याच्या क्रिकेट प्रवासाच्या पुढच्या अध्यायाची वाट पाहत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जॉर्ज बेली आणि अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्यासोबत माझ्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीबद्दल आणि प्रशिक्षणाविषयी वेड म्हणाला, “माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कदाचित शेवटच्या टी20 विश्वचषकानंतर संपले होते. याची मला पूर्ण जाणीव होती. ”
मॅथ्यू वेड पुढे म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून कोचिंग माझ्या रडारवर आहे. ही उत्तम संधी मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आणि उत्साहित आहे. मी बीबीएल (बिग बॅश लीग) खेळणे सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. आणि काही फ्रँचायझी लीग, पण एक खेळाडू म्हणून माझ्या वचनबद्धतेमुळे कोचिंगकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे. माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येत असताना, मी माझ्या सर्व ऑस्ट्रेलियन सहकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षकांचे आभार मानू इच्छितो.”
हेही वाचा-
IND VS AUS; भारताची डोकेदुखी वाढली, BGT मालिकेपूर्वी कांगारुंना मिळाला नवा सलामीवीर!
गॅरी कर्स्टनच्या अचानक राजीनाम्यानंतर केविन पीटरसनने पाकिस्तान बोर्डाला सुनावले, म्हणाला…
आधी संघातून बाहेर, मग केंद्रीय करारातूनही सुट्टी; ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो निवृत्ती