न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने फ्रिलांस क्रिकेटब बनण्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वर्षी त्याने न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघासोबत करार करण्यास नकार दिला होता. अशात आता तो आपल्या इच्छेप्रमाणे सामने खेळू शकतो. बोल्टच्या मते या निर्णयामुळे त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत आहे.
ट्रेंट बोल्ड (Trent Boult ) न्यूझीलंड क्रिकेट संघाचा महत्वाचा खेळाडू आणि घातक वेगवान गोलंदाज आहे. न्यूझीलंडसाठी त्याने आतापर्यंत 78 कसोटी, 99 वनडे आणि 55 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भविष्यात देखील मोठा काळ तो न्यूझीलंड संघाचा भाग राहू शकतो. पण मागच्या वर्षी त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे वार्षीक करारातून मुक्त करण्याची मागणी केली होती. क्रिकेट बोर्डाने देखील बोल्टची ही मागणी स्वीकार केली. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि जगभरातील लीग खेळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे बोल्टने सांगितले होते. दरम्यान, न्यूझीलंड संघाला त्याची गरज असेल, तर तो उपलब्ध असेल, असे बोल्ट म्हटला होता. सध्या तो आयपीएलसह जगभारातील वेगवेगळ्या टी-20 लीग खेळतो.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने न्यूझीलंड संघाच्या करारातून मुक्त झाल्यानंतर मिळालेल्या फायद्यांची माहिती दिली. तो म्हणाला, “मी नेहमीच क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटचा आनंद घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नक्कीच जास्त खेळले जात आहे. सोबत लीग देखील आयोजित केल्या जात आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट स्वाभाविक आहे आणि तो आयुष्यातील प्रत्येक फेजसोबत पुढे जात अशतो. मैदानाबाहेर देखील क्रिकेटपटूंचे आयुष्य असते, जसे की लग्न आणि मुले. पण आता परिस्थिती बदलली आहे. मला तीन छोटी मुल आहेत, ज्यांना मी आधी जास्त पाहूही शकत नव्हतो. पण मी ठरवू शकतो की, कधी त्यांच्यासोबत राहायचे आहे.”
दरम्यान, बोल्ट सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळत आहे. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सर्वात पहिला आहे. राजस्थानने हंगामातील चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. पुढचा सामना राजस्थानला रविवारी (16 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध खेळयचा आहे. (The benefit of leaving the central contract! Know why Trent Boult became a freelance cricketer?)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बुमराहची दुखापत आणि रिकव्हरीविषयी माहिती हवी आहे…’, भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
ब्रेंडन मॅकलम सापडला वादात? गंभीर प्रकरणात येऊ शकते एक वर्षाची बंदी, वाचा सविस्तर