झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यातील स्टार तिरंदाज दीपिका कुमारीला 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. गेल्या महिन्यात दीपिकाने पॅरिस येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या तिसर्या टप्प्यामध्ये 3 सुवर्ण पदके जिंकली होती. त्याचबरोबर झारखंडचे मुख्यमंत्री यांनी 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या टोकियो ओलंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणार्या झारखंडच्या खेळाडूला 2 करोड रुपये तर रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 1 करोड रुपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 75 लाख रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.
पॅरिसमध्ये दीपिकासोबत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला संघातील तिरंदाज अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांनादेखील मुख्यमंत्र्यांनी 20-20 लाख रुपयांचे तर प्रशिक्षक पौर्णिमा माहतोला 12 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. या व्यतिरिक्त झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ओलंपिकमधील भारतीय हॉकी संघामध्ये निवड झालेल्या निक्की प्रधान आणि सलीमा टेटे यांना देखील 5-5 लाख रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील प्रसिद्धी पत्रकातून असे जाहीर केले आहे की, ‘मुख्यमंत्र्यांनी सर्व चॅम्पियन्स खेळाडूंसाठी रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. ज्यामध्ये दीपिकाला 50 लाख रुपये, अंकिता आणि कोमोलिकाला 20-20 लाख रुपये, सलीमा आणि निक्कीला 5-5 लाख रुपयांचे तर प्रशिक्षक पौर्णिमा महतोला 12 लाख रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे.’
त्याचबरोबर पुढे असे देखील म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्र्यांनी ओलंपिक पदक जिंकणाऱ्या राज्यातील खेळाडूंसाठी देखील रोख रकमेचे बक्षीस घोषित केले आहे.’ त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान खेळाडू आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेती प्रशिक्षिका पौर्णिमा महतो यांच्यासोबत ऑनलाइन चर्चा देखील केले.
स्टार भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने गेल्या महिन्यात सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली. तिने विश्वचषकात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच महिला संघाबरोबर आणि मिश्र संघाबरोबर सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे व्वा! विराट कोहली आहे शाहिद आफ्रिदीचा आवडता खेळाडू ; ‘हे’ ७ क्रिकेटर्सही यादीत सामील