लंडनचे द ओव्हल मैदान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान खेळला जाणार आहे. तत्पूर्वी द ओव्हलच्या खेळपट्टीचे काही पोटो समोर येत आहेत. ही खेळपट्टी पाहून भारतीय संघाची डोकेदुखी नक्कीच वाढू शकते.
भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक () याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून द ओव्हल (The Oval) स्टेडियमच्या खेळपट्टीचे फोटो शेअर केले आहेत. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की, डब्ल्यूटीसी फायनलची (WTC Final) खेळपट्टी ग्रीन टॉप आहे. खेळपट्टीवर गवताचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती हिरव्या रंगाची दिसत आहे. म्हणजेच याठिकाणी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा मिळणार आहे.
भारतीय संघासोबत सध्या लंडनमध्ये असणाऱ्या रविचंद्रन अश्विन () याने या खेळपट्टीची माहिती थेट मैदानाती कर्णचाऱ्यांकडून घेतली. अश्विनच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओत मैदानाचे अधिकारी म्हणत आहेत की, “ही ओव्हलची एक चांगली खेळपट्टी असेल. याठिकाणी चेंडूला बाउंस मिळेल, हे मात्र नक्की. खेळपट्टीवर गोलंदाजांना बाउंस मिळेल. पाऊस येणार नाही, असे अपेक्षा.” दरम्यान, ओव्हलची खेळपट्टी पाहता सर्वाधिक निराशा ही अश्विनचीच होऊ शकते. कारण भारतीय संघ या खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. अशात प्लेइंग इलेव्हनमधून अश्विनचे नाव कमी केले जाऊ शकते. भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामने अनिर्णित राहिले आहे, तर दोन सामने भारताने जिंकले आहेत.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह डब्ल्यूटीसी फायनलसाठी मैदानात उतरतील. पण सध्या तरी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा अधिक भक्कम दिसत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ फंत आणि मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीत. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाजी आक्रमण भारताचा घाम काठण्यासाठी सज्ज आहे. असे असले तरी, भारतासाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव या वेगवान गोलंदाजाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना आहे. (The concern of the Indian team also increased after seeing the pitch of the WTC final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final । केव्हा आणि कुठे पाहणार भारत-ऑस्ट्रेलियातील थरार? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
‘कसं खेळावं हे त्याला सांगण्याची गरज नाही…’, WTC फायनलपूर्वी बोलला रोहित शर्माची