यंदा कोरोनाच्या महामारीमुळे बर्याच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे, तर काही स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. अशातच आता यंदा होणारा प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामसुद्धा एक वर्षासाठी पुढे ढकलला, अशी माहिती प्रो कबड्डी आयोजकांनी दिली.
यावर्षी प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम खेळवण्यात येणार होता. प्रो कबड्डी लीगमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही स्पर्धा एकवर्षासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रो कबड्डीचा ८ वा हंगाम पुढीलवर्षी पाहायला मिळू शकतो.
— ProKabaddi (@ProKabaddi) November 28, 2020
या स्पर्धेसाठी देशातील विविध शहरातील 12 संघाचा सहभाग असतो. आयपीएलच्या पाठोपाठ भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारी लीग म्हणून प्रो कबड्डीला ओळखले जाते. आयपीएल प्रमाणे या स्पर्धेत विदेशी खेळाडू सहभागी होतात. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय आणि देशांतर्गत कबड्डी खेळणारे खेळाडूसुद्धा सामील असतात.
2016 मध्ये एकाच वर्षात दोन हंगामाचे आयोजन केल होते. मात्र यंदाचा हंगाम कोरोनाच्या महामारीमुळे रद्द करण्यात आला.
मागील वर्षी खेळवण्यात आलेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये बेंगाल वारियर्स संघाने किताब जिंकला होता.
सात हंगामातील विजेतेपद पटकाविलेले संघ.
जयपूर पिंक पॅंथर्स(1), यू मुम्बा(1), पटणा पायरेट्स(3), बेंगळुरू बुल्स(1), बेंगाल वारियर्स (1) आतापर्यंत या पाच संघानी विजेतेपद पटकावले आहे.
एकदाही विजेतेपद न पटकावणारे संघ
पुणेरी पलटण, हरियाणा स्टिलर्स, तेलगू टायटन्स, यूपी योद्धा, गुजरात फाॅरच्युनजायंटस, दबंग दिल्ली, तामिळ थलाइवाज
या सात संघांनी एकदाही विजेतेपद मिळवले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कबड्डीच्या पहिलावहिल्या अर्जून पुरस्कार विजेत्याने असा केला होता आनंद साजरा
मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!
त्याने कुस्ती सोडली नसती तर आज भारत एका प्रतिभाशाली कबड्डीपटूला मुकला असता!