---Advertisement---

‘पाच’ आकड्याची जादू! चौथ्या कसोटीत झालेला ‘हा’ योगायोग पाहून व्हाल चकीत

On: गुरूवार, मार्च 4, 2021 11:14 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना गुरुवारी (४ मार्च) सुरु झाला. या सामन्यात पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी एक अनोखा ५ च्या आकड्याचा योगायोगही घडला आहे.

पाचच्या आकड्याचा योगायोग 

झाले असे की इंग्लंडचा पहिला डाव सुरु असताना ५ वी विकेट बेन स्टोक्सच्या रुपात पडली. बेन स्टोक्सचा जर्सी क्रमांक ५५ आहे. तसेच त्याला वॉशिंग्टन सुंदरने ५५ धावांवर बाद केले होते. सुंदर भारताकडून या डावात गोलंदाजी करणारा ५ वा गोलंदाज होता. तसेच त्याने त्याच्या ५ व्या षटकात गोलंदाजी करताना स्टोक्सला बाद केले. एवढेच नाही तर सुंदरचा जर्सी क्रमांक देखील ५ आहे आणि स्टोक्स इंग्लंडकडून ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला फलंदाज होता. त्यामुळे या गोष्टीचा विचार करतान ५ आकड्याचा योगायोग जुळून आल्याचे दिसत आहे.

https://twitter.com/kaustats/status/1367398914312212486

असे केले सुंदरने स्टोक्सला बाद 

सुरुवातीच्या विकेट्स झटपट गेल्यानंतर स्टोक्सने इंग्लंडचा डाव सांभाळला होता. दरम्यान, त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले होते. त्यामुळे आता स्टोक्स भारतीय गोलंदाजांना वरचढ ठरतो की काय असे वाटत असतानाच सुंदरने डावाच्या ४७ व्या षटकात टाकलेल्या चौथ्या चेंडूवर स्टोक्स चुकला आणि पायचीत झाला. त्यामुळे स्टोक्सला ६ चौकार आणि २ षटकारांसह १२१ चेंडूत ५५ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व 

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १२ षटकात १ बाद २४ धावा केल्या आहे. पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर नाबाद आहेत.

त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video : खराब फॉर्ममध्ये असलेल्या ‘या’ खेळाडूचे नशीबही देईना साथ, झाला अशा पद्धतीने बाद

रोहितला हे काय झालं? झेल घेत रहाणेकडे केलं अपील, व्हिडिओ होतोय व्हायरल

सातत्याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्या माजी कर्णधाराचा यू-टर्न, आता म्हणतोय “गेल्या काही सामन्यांपेक्षा…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---