भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला असून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांतील तिसरा कसोटी सामना 1 मार्च रोजी सुरू होईल. तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळू सकतात. सलामीवीर केएल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यांची जागा घेण्यासाठी दोन युवा भारतीय खेळाडू तयार आहे. अशात कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा निर्णय महत्वाचा ठरेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 11 मार्च रोजी सुरू होणाऱ्या या सामन्यात अनुभवी केएल राहुल (KL Rahul) प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान गमावू शकतो. बीसीसीआयने रविवारी (19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघ घोषित केला. या संघात केएल राहुलकडून भारताचे उपकर्णधारपद काढून घेतले गेले आणि प्लेइंग इलेव्हनमधील त्याची जागा जाण्याच्या चर्चाही सुरू झाल्या. राहुलचे मागच्या काही महिन्यांमधील प्रदर्शन देखील सुमार राहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने अवघ्या 38 धावांचे योगदान दिले.
अशात राहुल तिसऱ्या कसोटी खेळला नाही, तर यात अश्चर्य वाटण्यासारखे काही नसेल. राहुलच्या जागी युवा शुबमन गिल (Shubman Gill) भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्माला साथ देऊ शकतो. गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून 2023 सुरू झाल्यानंतर त्याने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये शतक ठोकले आहे. दुसरीकडे यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतची संघातील जागाही पक्की मानता येणार नाही.
केएस भरत (KS Bharat) याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी मोठा काळ वाट पाहावी लागली. अखेर त्याने यावर्षीच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत (BGT 2023) देशासाठी कसोटी पदार्पण केले. पण मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याचे प्लेइंग इळेव्हनमधील स्थान धोक्यात आहे. भरतने पदार्पणानंतर यष्टीरक्षकाची भूमिका चोख पार पाडली, पण फलंदाजीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. नागपूर आणि दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात निराश केल्यानंतर दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद 23 धावा केल्या. अशात इंदोरमध्ये भरतच्या जागी ईशान किशन (Ishan Kishan) याला संधी मिळू शकते.
अशात कोणाला खेळवायचे आणि कोणाला बाहेर बसलायचे, हा निर्णय सर्वस्वी मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या हातात असू शकतो. भारतीय संघासाठी हा तिसरा कसोटी सामना महत्वाचा असेल. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर संघ मालिका नावावर करेलच, पण सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील जागा पक्की करेल. अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होऊ शकतो. (The future of four Indian players will depend on Rahul Dravid)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा






