---Advertisement---

Video: ‘द ग्रेट’ खलीने फुटबॉलने खेळले क्रिकेट; चाहते म्हणाले, ‘आभाळाला छिद्र पडेल’

On: रविवार, नोव्हेंबर 14, 2021 3:13 PM
---Advertisement---

प्रसिद्ध भारतीय रेसलर ‘द ग्रेट खली’ आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. उंच आणि धिप्पाड शरीराचा खली जेव्हा रिंगमध्ये यायचा त्यावेळी प्रतिस्पर्धी रेसलरचा थरकाप उडायचा. तुम्ही त्याला आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना उचलून फेकताना पाहिलं असेल. परंतु कधी खलीला क्रिकेट खेळताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर खलीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर चाहते देखील प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

खली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. खली काही ना काही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत त्यांचे मनोरंजन करत असतो. नुकताच त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हातात बॅट घेऊन तो क्रिकेट खेळताना दिसतोय. परंतु खली आहे म्हटल्यावर काहीतरी हटके असणारच ना. तो क्रिकेटच्या चेंडूने नव्हे तर फुटबॉलच्या आकाराच्या चेंडुने क्रिकेट खेळतोय.

काही तासातच त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो टेरेसवर लुंगी घालून क्रिकेट खेळतोय. तसेच तो चेंडू पाहून चाहते देखील मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. इतक्या मोठ्या आकाराच्या चेंडूने मारलेला पल्लु स्कुप शॉट चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहे. अनेकांनी त्याला क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला तर अनेकांनी क्रिकेटमध्ये समालोचन करण्याचा देखील सल्ला दिला आहे.

https://www.instagram.com/p/CWL1D_7BXPr/?utm_medium=copy_link

एकेकाळी हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबलच्या रुममध्ये काम करणाऱ्या खलीने पहिल्यांदा कुस्तीपटू म्हणून देश-विदेशात आपला ठसा उमटवला. त्यानंतर तो काही हॉलिवूड आणि बॉलीवूड चित्रपटांमध्येही झळकला होता. त्याचे खरे नाव दलीपसिंग राणा असे आहे. सध्या तो सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याचे चाहते त्याच्या मजेशीर व्हिडिओंचा खूप आनंद घेतात.

महत्त्वाच्या बातम्या-

‘टीम इंडिया तो डूबी सनम, न्यूजीलंड को भी ले डूबे…’ भारतामुळे ऑस्ट्रेलियाचा टी२० विश्वचषक पक्का!!

अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच पेटून उठला; म्हणाला, ‘आम्हाला कमी लेखले गेले, पण आता..’

काय सांगता! राहुल द्रविडच्या जागी ‘या’ ठिकाणी झाली व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---