घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२०चे पर्व ३ काल (१४ मार्च) कपोलो वाडी हॉल, घाटकोपर येथे पार पडले. घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीगच्या पर्व ३ मध्ये या ३ खेळाडूंमध्ये अभिषेक नर ठरला सर्वात महागडा खेळाडू.
घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ च्या लिलावसाठी ३५० खेळाडूंमधून १६० ची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ७० खेळाडू घाटकोपर विभागातील तर ९० खेळाडु उपनगर जिल्ह्यातील होते. १६० पैकी १२० खेळाडूंना १० संघानी खरेदी केले.
प्रत्येक संघमालकाला ३० हजार रुपयांमध्ये संघ खरेदी करायचं होतं. प्रत्येक खेळाडूंची बोली १,००० रुपये पासून सुरू करण्यात येत होती. भटवाडी साईदर्शन पॅकर्स संघाने १२,२०० रुपयांची बोली लावत अभिषेक नर ला आपल्या संघात घेतले. दिल्ली योद्धा व आई शिंब्रादेवी वॉरियर्स या दोन संघात रस्सीखेच सुरू असताना अचानक भटवाडी संघाने अभिषेक नर वर बोली वाढवून अभिषेक नरला आपल्या संघात घेतले.
अभिषेक नर घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्या खालोखाल नामदेव इस्वलकरला रुद्रा रायडर्स संघाने ११,८०० रुपयांची बोली लावली. तर राजे चंद्रराव वारीयर्स संघाने सुयोग राजापकरसाठी १०,००० रुपये मोजले.
घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ मधील सर्वाधिक बोली लागले खेळाडु-
-अभिषेक नर- १२,२०० रुपये (भटवाडी साईदर्शन पॅकर्स)
-नामदेव इस्वलकर- ११,८०० रुपये (रुद्रा रायडर्स)
-सुयोग राजापकर- १०,००० रुपये (राजे चंद्रराव वारीयर्स)