इंग्लंडमधील द हंड्रेड लीगच्या पुढील हंगामासाठी नुकताच ड्राफ्ट जाहीर करण्यात आला. क्रिकेटच्या या नव्या प्रकारात अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. केवळ 100 चेंडूचे असलेले हे क्रिकेट अल्पावधीत लोकप्रिय होत असताना, ड्राफ्टमध्ये मात्र काही नामांकित खेळाडूंना दुर्लक्षित करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान या दोन्ही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. त्याचवेळी अनेक युवा क्रिकेटपटूंना मात्र या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.
गुरुवारी (23 मार्च) पार पडलेल्या ड्राफ्ट मध्ये 8 फ्रॅंचाईजींनी खेळाडूंची निवड यापूर्वी कायम केलेल्या खेळाडूंसह त्यांचे संघ आता पूर्ण झाले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व टी20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला रिझवान यांना कोणत्याही संघाकडून करार मिळण्याची आशा होती. मात्र, आठपैकी एकाही फ्रॅंचाईजीने त्यांच्यात रस दाखवला नाही. त्याचवेळी पाकिस्तानचे युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व हॅरिस रऊफ हे मात्र निवडले गेले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स साठी खेळणारा टीम डेव्हिड टॉप पीक ठरला.
नुकताच भारत दौरा गाजवलेला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू मिचेल मार्श हा प्रथमच ही स्पर्धा खेळताना दिसेल. तसेच न्यूझीलंडचा मायकल ब्रेसवेल, युवा रेहान अहमद व डेवॉन कॉनवे हे प्रथमच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
यावर्षी स्पर्धेचा तिसरा हंगाम खेळला जाईल. 100 चेंडूंच्या या नव्या प्रारूपात अनेक नवीन नियम देखील पाहायला मिळतात. स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. विशेष म्हणजे पुरुषांसोबतच द हंड्रेड लीग महिला क्रिकेटपटूंसाठी देखील खेळली जाते. या लीगमध्ये आघाडीच्या महिला भारतीय क्रिकेटपटू देखील सहभागी होतात.
(The Hundred League Draft Babar Rizwan Ignored)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये राजकारण! सूर्याच्या फ्लॉप शोमुळे काँग्रेस नेत्याचा बीसीसीआयवर निशाणा, सॅमसनला मिळाला सपोर्ट
वनडेतील 265 डावांनंतरही चमकतोय ‘किंग’ कोहली, पठ्ठ्याची सरासरी आहे सचिन अन् धोनीपेक्षाही जास्त; वाचाच