सध्या इंग्लंडच्या मैदानावर ‘द हंड्रेड’ स्पर्धा खेळली जात आहे. या लीगमध्ये बरीचशी लक्षवेधी दृश्ये पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित करताना दिसून येत आहेत. परंतु एक सामन्यात असे काही दृश्य पाहायला मिळाले, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. अफगाणिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज राशिद खानच्या गोलंदाजीदरम्यान अशी एक मजेदार घटना घडली, ज्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
सामन्यात यष्टीरक्षक यष्टीपासून दूर दिसत होता
या सामन्यात जेव्हा फिरकी गोलंदाज राशिद खान गोलंदाजी करत होता. तेव्हा यष्टीरक्षण करणे सर्वात कठीण असते. असे बरेचदा घडले आहे की, जेव्हा फिरकी गोलंदाज राशिद खान गोलंदाजी करत असतो, तेव्हा यष्टीरक्षक स्टंपच्या अगदी जवळ उभा असतो. पण ट्रेंट रॉकेट्स आणि वेल्श फायर यांच्यातील सामन्यादरम्यान, जेव्हा फिरकीपटू राशिद खान गोलंदाजी करण्यास आला; तेव्हा संघाचा यष्टिरक्षक टॉम मूरेस यष्टीपासून खूप दूर उभा असलेला दिसून आला. हा प्रकार पाहून सर्वांनाच नवल वाटले.
चाहते देखील गोंधळले
जगभरात असंख्य लोकांना क्रिकेट हा खेळ आवडतो. त्यामुळे बरेचसे चाहते प्रत्यक्ष सामना पाहायण्यासाठी स्टेडियममध्ये देखील जातात. हा सामना पाहण्यासाठीही काही क्रिकेटप्रेमी स्टेडियममध्ये उपस्थित होते. मात्र या सामन्यातील हे अनोखे दृश्य पाहून अनेकांनी आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
https://twitter.com/_friendlycheema/status/1423715356632289282?s=20
Wicket-keeper was standing back when Rashid Khan was bowling the first ball of his spell. #TheHundred pic.twitter.com/zIRf4VXXH2
— Johns. (@CricCrazyJohns) August 6, 2021
https://twitter.com/VChwodary/status/1423714970332647427?s=20
Tom Moores standing back to Rashid Khan is a very interesting thing…
— Nick Friend (@NickFriend1) August 6, 2021
I think the keeper is Tom Moores, not sure how many quick leggies he has kept to in his first class career.
Btw, Tom Moores is the son of Peter Moores ex-England coach.#TheCricketingLife
— The Cricketing Life (@lifecricketing) August 6, 2021
एका चाहत्याने म्हटले की, अफगाणिस्तान संघाचा गोलंदाज राशीद खान फिरकीपटू असून तो वेगाने गोलंदाजी करत असल्याने यष्टीरक्षक टॉम मूरेसने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. पण हा सर्व प्रकार पाहून अजूनही बरेच लोक गोंधळून गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात १००% मनोरंजन! रिषभ मैदानातच मारू लागला बेडूक उड्या, रोहित-विराट अचंबित
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाने शाकिबला दिवसा दाखवले चांदणे, लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद