IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. क्रिकेट असो किंवा कोणताही दुसरा खेळ, दोन्ही देशांचे चाहते आपल्या संघाला जिंकवण्यासाठी खूप प्रार्थना करतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा क्रिकेट सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत पाकिस्तानला धूळ चारली होती. आता (20 जुलै) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. पण यात फरक एवढाच की, या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. (India vs Pakistan Cricket Match)
18 जुलैपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 ला सुरुवात होणार आहे. (World Championship of Legends 2025) या स्पर्धेचा पहिला हंगाम 2024 मध्ये खेळला गेला होता. पहिल्या हंगामातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला होता. आता दुसऱ्या हंगामातही दोन्ही देश आमनेसामने येण्यासाठी सज्ज आहेत. 20 जुलै रोजी इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात हा सामना खेळला जाईल. (India Champions vs Pakistan Champions) भारत आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू आपापल्या संघासाठी खेळतील. भारताचे कर्णधारपद युवराज सिंग सांभाळणार आहे, तर पाकिस्तानचे युनूस खान सांभाळताना दिसेल. (India Champions vs Pakistan Champions)
भारत-पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला एजबेस्टन येथे खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार या सामन्याचे थेट प्रक्षेपण दुपारी 4:30 वाजता सुरू होईल. भारताकडून सुरेश रैना, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ यांसारखे खेळाडू भाग घेतील, तर पाकिस्तानकडून मिस्बाह-उल-हक, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि शोएब मलिक यांसारखे माजी दिग्गज खेळताना खेळतील. (Former Cricketers Match)
दोन्ही संघांचे स्क्वॉड-
इंडिया चॅम्पियन्स- युवराज सिंग (कर्णधार), सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, विनय कुमार, हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा, युसूफ पठाण, नमन ओझा, मुनाफ पटेल, रतिंदर सिंग सोढी, आरपी सिंग, अशोक डिंडा
पाकिस्तान चॅम्पियन्स- युनूस खान (कर्णधार), शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिस्बाह-उल-हक, इम्रान नजीर, मोहम्मद हफीज, कामरान अकमल, सलमान बट, अब्दुल रज्जाक, वहाब रियाज, मोहम्मद आमिर, यासिर अराफात, सोहेल तनवीर, सईद अजमल, उमर गुल