भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 4 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. पण या मालिकेत शिवम दुबे, मयंक यादव या खेळाडूंना संधी मिळाली नाही.
बांगलादेशविरूद्धच्या टी20 मालिकेत 40 चेंडूत शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनने (Sanju Samson) सध्या टी20 संघात आपले स्थान राखून ठेवले. तर प्रतिभावान खेळाडू नितीश कुमार रेड्डीला टी20 संघात स्थान मिळाले नसून ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळाले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, अवेश खान, यश दयाल
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना 8 नोव्हेंबरला डर्बनमध्ये तर दुसरा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. तिसरा आणि चौथा टी20 सामना अनुक्रमे 13 आणि 15 नोव्हेंबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
BGT 2024-25; बाॅर्डर गावसकर ट्राॅफीसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूला संधी
सेहवागने राजकारण करुन मला फसवलं! पंजाब किंग्जच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप
चेंडू लागला, रक्तस्त्राव होऊ लागला; तरीही पाकिस्तानच्या खेळाडूने सोडलं नाही मैदान






