भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात समाधानकारण प्रदर्शन केले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पराभव मिळाला, पण टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत भारताने प्रत्येकी १-२ अशा अंतराने विजय मिळाला. इंग्लंड दौरा पार पाडल्यानंतर भारतीय संघाला वेस्ट इंडीज दौरा करायचा आहे. बुधवार (२० जुलै) भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल झाला.
वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघाला पहिल्यांदा तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेत दिग्गज शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करणार असून रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर असेल. उभय संघातील एकदिवसीय मलिका २२ जुलै रोजी सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना २२, दुसरा सामना २४, तर तिसरा एकदिवसीय सामना २७ जुलै रोजी खेळला जाईल.
एकदिवसीय मालिका संपल्यानंतर उभय संघातील टी-२० मालिका सुरू होणार आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघचा नियमित कर्णधार रोहित शर्मा संघासोबत जोडला जाईल. रवींद्र जडेजा या मालिकेत संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडेल. टी-२० मालिकेतील पहिला सामना २९ जुलै रोजी खेळला जाईल. मालिकेतील पुढचे चार टी-२० सामने अनुक्रमे, १, २, ६ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळले जातील.
भारतीय संघ त्रिनिदादमध्ये पोहोचल्यानंतर बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ –
Trinidad – WE ARE HERE! 👋😃#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/f855iUr9Lq
— BCCI (@BCCI) July 20, 2022
भारतीय संघाला वेस्ट इंडीज दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची कमी इतर खेळाडूंना जाणवेल. विराटने या मालिकेदरम्यान विश्रांती मागितली असून, जसप्रीत बुमराहचा वर्क लोड लक्षात घेता त्याला या मालिकेतून विश्रांती दिली गेल्याचे समजले आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या खेळाडूंची फिटनेस संघासाठी महत्वाचा मुद्दा आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बाबो! आत्ताच भारत विरुद्ध पाकिस्ताच्या सामन्याची १२ लाख तिकीटे झालीत बुक, वाचा कधी रंगणार लढत
जयसूर्याच्या मॅजिकल बॉलवर विराटचा विक्रम मोडीत काढणारा बाबर चीतपट! पाहा व्हिडिओ
लॉर्ड्सवर पुजाराची कॅप्टन्स इनिंग! ठोकले नाबाद शतक; वॉशिंग्टनचे ‘सुंदर’ पदार्पण