श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला 3 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. पहिले दोन सामने जिंकून भारताने एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे शेवटचा एकदिवसीय सामना गमावल्यानंतरही मालिका भारताच्या नावात कायम राहिली. परंतु अखेरच्या सामन्यात प्रशिक्षक राहुल द्रविडला युवा खेळाडूंवर आत्मविश्वास ठेवणे खूप महागात पडले आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव 43.1 षटकांत केवळ 225 धावांवर संपला होता. पावसामुळे सामना 47-47 षटकांचा करण्यात आला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने 39 षटकांत 7 गडी गमावून विजय मिळविला. शेवटी संघाला काही ना काही अडथळे आले असतील पण सामना कधीही त्यांच्या आवाक्याबाहेरचा नव्हता. 48 चेंडू बाकी असताना श्रीलंकेने 3 गडी राखून भारतावर विजय मिळवला.
प्रशिक्षक द्रविडच्या निर्णयामुळे सामना हरला
तिसर्या सामन्यात प्रशिक्षक द्रविडने पाच खेळाडूंना एकाच वेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. त्यामुळे गोलंदाजीची आक्रमकता पूर्णपणे नवीन होती आणि त्यात एकही अनुभवी गोलंदाज नव्हता. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासह कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनाही विश्रांती देण्यात आली. हार्दिक पांड्या हा एकमेव गोलंदाज होता ज्याला एकदिवसीय सामन्यांचा अनुभव होता. पण त्यालाही साजेशी कामगिरी करता आली नाही.
5 खेळाडूंनी केले पदार्पण
श्रीलंका संघाविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक संजू सॅमसन, फलंदाज नितीश राणा, गोलंदाज राहुल चहर, चेतन साकारिया आणि कृष्णाप्पा गौतम यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. देण्यात आले आहे. यातून सॅमसन आणि राहुलने उत्कृष्ट पदार्पण केले. पण बाकीचे खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाहीत. सामन्याच्या सुरुवातीला विकेट न मिळाल्यामुळे भारतीय संघाकडून श्रीलंकेला हरवणे खूप कठीण झाले आणि भारताने हा सामना गमावला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा
पंतचे संघात जोरदार स्वागत तर केले, पण ‘ते’ ट्विट केल्याने रवी शास्त्री होतायेत जोरदार ट्रोल
विराटचा ‘तो’ फोटो शेअर करत २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यातील आठवणींना उजाळा; दिले मन जिंकणारे कॅप्शन