बेंगलोर येथे गुरूवार, दिनांक १४ जून २०१८पासून भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना सुरू होत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी खबरदारीचे पाऊलं उचलली आहेत.
अफगाणिस्तानच्या रशिद खान आणि मुजिब उर रेहमान या फिरकी दुकलीचा सामना करण्यासाठी एम. चिन्नास्वामी मैदानावर भारतीय फलंदाजांना फिरकीचा सराव व्हावा म्हणून युझवेंद्र चहल आणि शिविल कौशिक या लेग स्पिनर्सना नेटमधे गोलंदाजी करण्यासाठी बोलावून घेतले आहे. हे दोघेही 15 सदस्सिय भारतीय कसोटी संघात नाहीत.
गेल्या एक वर्षांपासून युझवेंद्र चहलने मर्यादित षटकांच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली आहे. या कसोटीत जर अश्विन-जडेजाची कामगिरी खराब झाली तर चहलची इंग्लडमधील कसोटी मालिकेत निवड होऊ शकते.
आयपीयल आणि बांगलादेश विरूद्ध रशिद खाने व मुजिब उर रेहमानने चमकदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीचा भारतीय संघाने चांगला धसका घेतलेला दिसतोय. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून रशिद आणि मुजिब आयपीयल निमित्ताने भारतात असल्यामुळे त्यांनी भारतीय परिस्थितीशी चांगले जुळवून घेेतले आहे.
भारतीय संघात आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि चायनामन गोलंदाज कुलदिप यादव यांचा समावेश आहे. भारत या सामन्यात कोणत्या दोन फिरकीपटूंना संधी देणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
–फिटनेसच्या कारणावरुन मोहम्मद शमीला भारतीय संघातून वगळले, या खेळाडूला मिळाली संधी!
–291 कसोटी सामने आणि 33 वर्षांनंतर विंडिज संघाने केला हा कारनामा!
–सेहवागने षटकार मारण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला बदलायला लावले क्षेत्ररक्षण!





