---Advertisement---

टेबल टेनिसमध्ये भारताचा धमाका, महिला संघ क्वार्टरफायनलमध्ये दाखल…!

On: सोमवार, ऑगस्ट 5, 2024 4:34 PM
Table Tennis
---Advertisement---

सध्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) सुरु आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. तत्पर्वी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय महिला संघानं टेबल टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. टेबल टेनिस (Table Tennis) सांघिक स्पर्धेत भारतीय महिला संघानं चमकदार कामगिरी केली.

श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघानं रोमानियाचा पराभव करुन महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारताचं आव्हान प्रथमच असून श्रीजा, अर्चना आणि मनिका यांच्या संघानं चमकदार कामगिरी करत रोमानियाचा पराभव केला. या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या भारतानं चौथ्या क्रमांकाचा संघ रोमानियाचा 3-2 असा पराभव केला.

या सामन्यात श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ या जोडीनं दुहेरीत प्रथम प्रवेश केला. या भारतीय जोडीनं सलामीच्या लढतीत रोमानियाच्या एडिना आणि समारा जोडीचा 3-0 असा पराभव करुन आघाडी घेतली होती. त्यांनी एडिना आणि समारा यांचा 11-9, 12-10, 11-7 अशा फरकानं पराभव केला. त्यानंतर मनिकानं पुढच्या सामन्यात प्रवेश केला. हा एक सामना होता आणि त्यांनी बर्नाडेटचा 3-0 असा सहज पराभव केला. मनिकाने बर्नाडेटचा 11-5, 11-7, 11-7 अशा फरकानं पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या-

3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं
IND vs SL कर्णधार रोहित शर्मानं रचला इतिहास..! ‘या’ 4 दिग्गजांना पछाडलं
क्रिकेट विश्वात शोककळा! 100 कसोटी सामने खेळलेल्या दिग्गज फलंदाजाचं निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---