---Advertisement---

IND vs ENG: एजबेस्टनमध्ये ‘फिरकीचा जादूगार’ खेळणार का? माजी क्रिकेटरने प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याचा दिला सल्ला

On: शनिवार, जून 28, 2025 7:06 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून एजबेस्टनमध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियाच्या (Team India) बाजूने पाहायचे झाल्यास, त्यांना या सामन्यात विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर कर्णधार गिलला (Captain Shubman Gill) या मालिकेत पुनरागमन करायचे असेल, तर हा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून ज्या चुका झाल्या त्याला सुधारण्याची आता वेळ आलेली आहे.

अशा परिस्थितीत टीम इंडिया समोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे योग्य प्लेइंग इलेव्हन निवडणे असेल. पराभवानंतर खूप मोठे प्रश्न समोर येत आहेत, ज्याची उत्तरे प्रशिक्षक गंभीर (Gautam Gambhir) आणि व्यवस्थापनाला लवकरच शोधावी लागतील.

अशा परिस्थितीत माजी खेळाडू संजय बांगर (Indian former Cricketer Sanjay Banger) यांनी टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा सल्ला देत कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात सामील करण्याचा सल्ला दिला आहे.
पहिल्या पराभवानंतर टीम इंडियावर खूप प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यामधीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याची गोष्ट सुद्धा होती. क्रिकेट एक्सपर्ट यांचं म्हणणं आहे की, इंग्लंड विरुद्ध कुलदीप यादव महत्त्वाचा ठरू शकतो. माजी भारतीय खेळाडू संजय बांगर यांनी स्टार स्पोर्ट्स वर बोलताना म्हटले की, आपण हा विचार करायला हवा की कोणत्या पद्धतीने कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते.

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड फलंदाजांनी फिरकी गोलंदाजी समोर ज्या प्रकारे खेळ दाखवला ते पाहता कुलदीप दुसऱ्या सामन्यात टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू ठरवू शकतो.

अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, कुलदीप यादवला कोणत्या खेळाडूच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाईल आणि गंभीर रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागेवर कुलदीप यादवला स्थान देऊ शकतात. जडेजाने पहिल्या सामन्यात काही प्रभावी कामगिरी केली नाही. त्याने केवळ 1 विकेट घेतली आणि फक्त 36 धावा केल्या. इंग्लंडच्या खेळपट्टीवर भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकी गोलंदाजांना सामील करण्याची चूक करणार नाही.

कुलदीप यादवने 2017 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया खेळाडूंना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यानंतर त्याचं कसोटी क्रिकेट शानदार पद्धतीने पुढे गेले. त्याने भारतासाठी आत्तापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 56 विकेट्स घेतलेल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---