आयपीएल 2023 हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ शनिवारी (8 एप्रिल) एकमेकांशी भिडणार आहे. हंगामात पहिल्यांदाज हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने आहेत. चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पण हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे चाहत्यांचा उत्साहावर पाणी फेरण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यातील हा सामना शनिवारी सायंकाळी 7.30 मिनिटांनी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. दोन्ही संघांचे चाहते वानखडे स्टेडियमवर पूर्ण तयारीसह उपस्थित राहणार आहेत. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी (8 एप्रिल) मुंबईत मुसळधार पाऊस येऊ शकतो. ही शक्यता खरी ठरली, तर मुंबई विरुद्ध चेन्नई सामना पावसात धुतला जाईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये गारपिटीसह वादळी वारे हजेरी लावू शकतात.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर दोन्ही संघाचे दोन प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि चेन्नईचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स यांना शनिवारच्या सामन्याआधी सराव करताना दुखापत झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या-त्यांच्या संघांसाठी महत्वाचे आहेत. अशात या खेळाडूंना अचानक माघार घ्यावी लागली, तर मुंबई आणि चेन्नईसाठी ऐन वेळी त्यांची जागा भरून काठणे नक्कीच जिकिरीचे काम असेल.
मुंबईसाठी चालू आयपीएल हंगामातील हा दुसरा, तर सीएसकेसाठी तिसरा सामना असेल. मुंबई इंडियन्सने हंगामातील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध बेंगलोर संघाविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्वीकारला होता. अशात संघ दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे सीएसकेने आपल्या पहिल्या दोन सामन्यांपैकी एकात पराभव, तर एका विजय मिळवला आहे. हंगामातील पहिला सामना सीएसके आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये गुजरातने 5 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्या सीएसकेने 12 धावांनी विजय मिळवला. (The match between Mumbai Indians vs Chennai Super Kings is likely to be cancelled)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसी फायनलसाठी पुजाराने ठोकली दावेदारी! काऊंटी क्रिकेटमध्ये तडाखेबंद शतक
मुंबईशी भिडण्याआधीच सीएसकेला मोठा झटका! अष्टपैलू पायाच्या दुखापतीमुळे माघार घेण्याच्या तयारीत