2025चा आयपीएल मेगा लिलाव (IPL Mega Auction) सौदी अरेबियातील जेद्दाह येथे (24 ते 25 नोव्हेंबर) या 2 दिवशी पार पडला. आयपीएल 2025च्या मेगा लिलावाने खेळाडूंच्या कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. लिलावात एकूण 182 खेळाडू विकले गेले, ज्यावर 639.15 कोटी रुपये खर्च झाले. तर लिलावापूर्वी 46 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते, तेव्हा त्यांच्यावर एकूण 558.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एकूण 228 खेळाडू आगामी आयपीएल हंगामात खेळताना दिसणार आहेत. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण प्रत्येक संघाचा सर्वात महागडा खेळाडू कोण? जाणून घेऊया.
1) लखनऊ सुपर जायंट्स- रिषभ पंत (27 कोटी)– आयपीएल 2025च्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतला (Rishabh Pant) 27 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. ही आयपीएल इतिहासातील खेळाडूवर लावलेली सर्वात मोठी बोली होती.
2) पंजाब किंग्स- श्रेयस अय्यर (26.75 कोटी)- पंजाब किंग्सनेही (PBKS) यावेळी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
3) कोलकाता नाइट रायडर्स- व्यंकटेश अय्यर (23.75 कोटी)- कोलकाताने लिलावात व्यंकटेश अय्यरचे सर्व विक्रम मोडीत काढले. कोलकाता संघाने त्याला 23.75 कोटी रुपये देऊन खरेदी केले.
4) सनरायझर्स हैदराबाद- हेनरिक क्लासेन (23 कोटी)- सनरायझर्स हैदराबादने लिलावात सर्वाधिक रक्कम इशान किशनवर खर्च केली. हैदराबादने किशनला 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पण त्याआधी हैदराबादने हेनरिक क्लासेनला 23 कोटी रुपये देऊन कायम ठेवले होते.
5) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली (21 कोटी)- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही (RCB) लिलावात एकाही खेळाडूवर जास्त पैसा खर्च केला नाही. लिलावात आरसीबीने जोश हेजलवूडवर सर्वाधिक 12.50 कोटी रुपयांची बोली लावली. पण या संघातील सर्वात महागडा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आहे.
6) गुजरात टायटन्स – राशिद खान (18 कोटी)- मेगा लिलावात गुजरात टायटन्सने (GT) जोस बटलरवर (Jos Buttler) सर्वात मोठी बोली लावली, ज्याला संघाने 15.75 कोटी रुपयांना विकत घेतले. पण राशीद खानला (Rashid Khan) गुजरातने 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
7) चेन्नई सुपर किंग्ज- रूतुराज गायकवाड/रवींद्र जडेजा (18 कोटी)- लिलावात सीएसकेने नूर अहमदला 10 कोटी रुपयांना खरेदी केले. पण आयपीएल 2025 मध्ये सीएसकेचे सर्वात महागडे खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रूतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आहेत.
8) दिल्ली कॅपिटल्स- अक्षर पटेल (16.50 कोटी)- लिलावात दिल्ली कॅपिटल्सने (DC) केएल राहुलवर (KL Rahul) 14 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र यापूर्वीच संघाने अक्षर पटेलला (Axar Patel) 16.50 कोटी रुपयांना कायम ठेवले होते.
9) मुंबई इंडियन्स- जसप्रीत बुमराह (18 कोटी)- मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 12.50 कोटींची सर्वात महागडी बोली लावून ट्रेंट बोल्टला (Trent Boult) विकत घेतले. पण जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू आहे.
10) राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन/यशस्वी जयस्वाल (18 कोटी)- जोफ्रा आर्चरला राजस्थान रॉयल्सने लिलावात सर्वाधिक 12.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. पण राजस्थानने संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वालला यांना प्रत्येकी 18 कोटी रुपये देऊन कायम ठेवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याने सीएसकेच्या गोलंदाजाला धुतला, एकाच षटकात ठोकल्या 29 धावा
सीएसकेचा मालक उघडपणे फिक्सिंग करायचा, आयपीएल संस्थापकांचा गंभीर आरोप!
IND vs AUS; विराटने कशामुळे झळकावले शानदार शतक? गावसकरांचे मोठे वक्तव्य






