---Advertisement---

‘मला वडिलांचा अभिमान आहे,’ शेन वाॅर्नच्या मृत्यूनंतर आली मुलगा जॅक्सनची प्रतिक्रिया; दिग्गजाची आईही हळहळली

Shane-Warne-And-Jackson-Warne
---Advertisement---

शुक्रवारी (०४ मार्च) संध्याकाळी उशिरा ५२ वर्षीय खेळाडू शेन वाॅर्नचा (Shane Warne) मृत्यू झाला आहे. थायलंडमध्ये असलेल्या त्याच्या विल्हामध्ये तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या मित्रांनी त्याला दवाखान्यात दाखल केले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू (Shane Warne Death) झाला होता. आपल्या सर्वोत्तम गोलंदाजीमुळे जगभरात ओळख असलेल्या शेन वाॅर्नच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. काही काळापूर्वीच तो एका सामन्यादरम्यान मैदानात दिसला होता. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरपासून ते ब्रायन लारापर्यंत सर्वच दिग्गजांनी वाॅर्नच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे.

शेन वाॅर्नचे कौटुंबिक जीवन विवादास्पद राहिले आहे. परंतु त्याचा परिणाम त्याच्या मुलांवर झाला नाही. त्याचा २४ वर्षीय मुलगा जॅक्सन वाॅर्न म्हणाला की, त्याला त्याच्या वडिलांवर गर्व आहे. वाॅर्नला समर आणि ब्रुक या दोन मुली देखील आहेत. परंतु वाॅर्नची पत्नी २००७ मध्येच त्याच्यापासून वेगळी झाली आहे. जॅक्सनने शेन वाॅर्नच्या मृत्युनंतर अजूनही आपले मत मांडले नाही. परंतु मागील काही काळात त्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, “मला वाटते की त्यांनी माझ्यावर गर्व करावा.”

जॅक्सन वाॅर्न त्याचे वडील शेन वाॅर्नसोबत मागील ४ वर्षांपासून मेलबर्नमध्ये राहत होता. तो म्हणाला की, “माझे आयुष्य खूप निराशाजनक राहिले आहे. जेव्हा मी कोठे जायचो, तेव्हा लोक म्हणायचे की, तू शेन वाॅर्नचा मुलगा जॅक्सन आहे. तू जॅक्सन आहे हे कधी कोणी म्हणायचे नाही. मला फक्त जॅक्सन बनायचे आहे.”

शेन वाॅर्नच्या आईने मुलाच्या जाण्यावर एवढेच म्हटले आहे की, “आम्ही दुखी आहोत.” जॅक्सन वाॅर्न म्हणाला की, “मला वडिलांना फक्त वडिलांच्या जागी पाहावेसे वाटते. मला त्यांची तुलना कोणत्या दुसऱ्या पालकांशी करू वाटते नाही. मला त्यांना फक्त आनंदी पाहायचे आहे. मला वाटते की, त्यांनी खूप चांगले काम केले आहे आणि मला त्यांच्यावर खूप गर्व आहे. मला माझ्या वडिलांमुळे सुरुवातीला खूप त्रास झाला. परंतु आता मी खूप खुश आहे.”

शेन वाॅर्नच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्याने ब्रिटनची अभिनेत्री लिज हर्लेसोबत साखरपूडा सुद्धा केला होता. जॅक्सन म्हणाला की, “मला फक्त मानसिक स्थिती बदलायची होती. माझे वडील कोण आहेत, हे मी स्वत: निवडले नव्हते. परंतु त्यांनी जे काही केले ते खूपच भयंकर होते. मला आज त्यांची साथ मिळाली आहे आणि त्यांची मला मिळालेली साथ ही चांगली होती. मी याता आनंदही घेत आहे.”

शेन वाॅर्न आपल्या मुलासोबत काहीवेळा मस्ती सुद्धा करताना दिसला होता. त्याने आपल्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर सुद्धा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत

तू सर्वोत्तम ठरला! पॉंटिंगकडून वॉर्नला भावूक शब्दांत श्रद्धांजली

वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---