---Advertisement---

ऑरेंज कॅपसाठी रंगतोय संगीत खुर्चीचा खेळ! अव्वल 4 फलंदाजांमध्ये अटीतटीची लढत, तर विराट कोहली पाचव्या क्रमांकावर

On: रविवार, एप्रिल 26, 2026 6:28 PM
---Advertisement---

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत युवा फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. पण यावेळी ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी फलंदाजांमध्ये संगीत खुर्ची सुरु असल्याचं दिसून आलं. जवळपास प्रत्येक सामन्यात ऑरेंज कॅपचं समीकरण बदलताना दिसून येत आहे. सुरुवातीला रोहित शर्माकडे ऑरेंज कॅप होती. त्यानंतर विराट कोहलीने देखील ऑरेंज कॅप पटकावली. पण आता विराट या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान सुरुवातीच्या ४ स्थानांवर कोण आहे? जाणून घ्या.

या स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. दोन्ही सामन्यांमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने १५२ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा केला. पण ही ऑरेंज कॅप त्याच्याकडे काही मिनिटंच राहिली. कारण अवघ्या काही मिनिटांनंतर वैभव सूर्यवंशीने ही कॅप त्याच्याकडून हिसकावली. केएल राहुलने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ३५७ धावा केल्या आहेत. पण दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने दमदार शतकी खेळी केली. या १०३ धावांच्या खेळीसह त्याने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप पटकावली. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ३५७ धावा केल्या आहेत.

पण ही कॅप वैभवच्या डोक्यावरही फार काळ टिकून राहिली नाही. पुढच्याच डावात, धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीकडून ऑरेंज कॅप हिसकावली. धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने दमदार खेळी केली. यासह पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर कब्जा केला. अभिषेक शर्माने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ३८० धावा केल्या आहेत. तर हैदराबादचा आणखी एक स्फोटक फलंदाज या यादीत चौथ्या स्थानी आहे. हेनरिक क्लासेनने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ३४९ धावा केल्या आहेत. तर विराट कोहली या यादीत पाचव्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावे ३२८ धावा करण्याची नोंद आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---