---Advertisement---

ऋषभ पंतकडून कसोटी उपकर्णधारपद काढून घेतल्याने खळबळ! सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण

On: मंगळवार, मे 19, 2026 8:45 PM
---Advertisement---

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी ऋषभ पंतच्या (Rishbh pant) भूमिकेबद्दल आधीपासूनच तर्कवितर्क लावले जात होते, पण 19 मेच्या संध्याकाळी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब झाले. या धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाजाकडून केवळ कसोटी संघाचे उपकर्णधारपदच काढून घेण्यात आले नाही, तर त्याला वनडे (एकदिवसीय) संघातूनही डच्चू देण्यात आला आहे.

गेल्या रविवारी ‘पीटीआय’च्या (PTI) सूत्रांकडून अशी माहिती समोर आली होती की, उपकर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे पंतच्या स्वतःच्या कामगिरीवर परिणाम व्हावा, असे निवडकर्त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्याला मैदानावर मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळायला हवी, असा विचार निवडकर्ते करत होते.

या निर्णयामागचे कारण समजणे फारसे अवघड नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19व्या हंगामात ‘लखनऊ सुपरजायंट्स’चा (LSG) कर्णधार म्हणून पंत पूर्णपणे अपयशी ठरला. चालू हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा लखनऊ हा पहिला संघ ठरला. त्यातच या संपूर्ण हंगामात पंतची स्वतःची वैयक्तिक कामगिरीही कौतुक करण्यासारखी झाली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---