भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात नुकतीच 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने 2-0 ने बांगलादेशचा धुव्वा उडवला. तत्पूर्वी आगामी भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्याआधीच न्यूझीलंडच्या कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.
सप्टेंबर महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर 0-2 अशा पराभवानंतर न्यूझीलंडचा माजी कर्णधार टीम साऊदीने (Tim Southee) राजीनामा दिला. त्यानंतर टाॅम लॅथमला (Tom Latham) न्यूझीलंडची कमान मिळाली. पण त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा पहिला भारत दौरा हे त्याचे पहिले आव्हान आहे. लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत बेंगळुरू, पुणे आणि मुंबई येथे 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
भारताविरूद्ध असणाऱ्या आगामी कसोटी दौऱ्याबद्दल बोलताना लॅथम म्हणाला, “हा एक आव्हानात्मक दौरा असेल आणि मला आशा आहे की, आम्ही अधिक स्वातंत्र्याने आणि न घाबरता खेळू. आम्ही असे केल्यास आमची जिंकण्याची शक्यता जास्त असेल. गेल्या काही वर्षांत अनेक विदेशी संघांनी उत्कृष्ट कामगिरी करून त्यांच्यावर दबाव आणल्याचे आपण पाहिले आहे. पण यासाठी तुम्हाला विशेषतः फलंदाजीत आक्रमक व्हावे लागेल. तिथे आम्हाला कसे खेळायचे आहे हे आम्ही ठरवू आणि खेळाडूंनाही चांगला दृष्टिकोन दाखवावा लागेल.”
पुढे बोलताना टाॅम लॅथम (Tom Latham) म्हणाला, “आम्ही श्रीलंकेत काही चांगल्या गोष्टी केल्या, तरीही निकाल आमच्या बाजूने लागला नाही. एक डाव सोडला तर आमचा फलंदाजीचा दृष्टिकोन अगदी योग्य होता. आम्हाला तेच चालू ठेवायचे आहे आणि आम्हाला अभिमान वाटेल असे चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आशा आहे की आम्ही ते करू.”
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात पहिला कसोटी सामान 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर या मालिकेचा शेवटचा सामना 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक फायनल नाही, तर भारत-दक्षिण आफ्रिकेचा हा सेमीफायनल सामना थरारक!
हा कसला किंग? 2 वर्षांपासून कसोटीत एकही अर्धशतक नाही!
कष्टाचं चीज झालं! टी20 वर्ल्डकप विजेत्या खेळाडूला मिळालं पोलिसात डीएसपी पद