आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित क्रिकेट लीग आहे. आयपीएलचा किताब जिंकणे हेच प्रत्येक संघाचे लक्ष असते. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकविण्यासाठीच मैदानात उतरतो. परंतु आज आपण अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत जो तब्बल 6 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभूत संघाकडून खेळला आहे.
ज्या खेळाडूबद्दल आपण बोलत आहोत तो दुसरा कोणी नाही तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने आत्तापर्यंत 9 वेळा अंतिम सामना खेळला आहे. 8 वेळा त्याने चेन्नईकडून तर 1 वेळा रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून अंतिम सामना खेळला आहे.
पाच वेळा चेन्नई संघाचा तर एक वेळा पुणे संघाचा झाला पराभव
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ 8 पैकी 5 वेळा अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. 2016 आणि 2017 या दोन हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाला अनधिकृत बेटिंग प्रकरणामुळे निलंबित करण्यात आले होते. या संघांची जागा रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स या दोन संघांनी घेतली होती.
एमएस धोनी 2016 मध्ये पुणे संघाचा कर्णधार होता.मात्र 2017 मध्ये हा संघ स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात खेळला. 2017 ला धोनी पुणे संघात एक खेळाडू म्हणून सहभागी होता. 2017 मध्ये पुणे संघ अंतिम सामन्यात पोहचला होता. पण पुण्याला अंतिम सामन्यात पराभवचा सामना करावा लागला होता.
चेन्नईकडून खेळत असताना धोनीला पहिल्यांदा 2008 मध्ये अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम सामना गमावला लागला. त्यानंतर 2013, 2015, 2019 या वर्षी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला अंतिम सामन्यात पराभूत केले होते.
एमएस धोनीने 3 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी असताना त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध अंतिम सामना जिंकला होता. त्याचवेळी 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात आरसीबी संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला होता आणि 2018 मध्ये धोनीच्या चेन्नई संघाने आयपीएलच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी; या ४ भारतीयांचा आहे समावेश
कोणाला आहे यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याची सर्वाधिक संधी? गावसकरांनी वर्तवला अंदाज
सचिनची २० वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी