जगभरात पसरलेला कोरोना व्हायरसने सर्वांना चिंतेत टाकले आहे. त्यामुळे या व्हायरसला लवकरात लवकर नष्ट करण्यासाठी आयपीएलमधील फ्रंचायझीही सरसावले आहेत.
सनरायजर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) मंगळवारी (७ एप्रिल) या व्हायरसविरुद्धच्या लढाईत १० कोटी रुपयांची मदत (Help of 10 Lakh Rupees) केली. या संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “सन टीव्ही समूह कोरोना व्हायरसच्या या लढाईत १० कोटी रुपयांचे योगदान देत आहे.”
Sun TV Group (SunRisers Hyderabad) is donating Rs.10 Crores towards Corona Covid-19 relief measures. #COVID19 #CoronaUpdate
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 9, 2020
सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) संघाच्या या मदतीची प्रशंसा केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “सन टीव्ही समूहाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे.”
How good is this well done Sun TV Group @SunRisers https://t.co/bToZNyQNdx
— David Warner (@davidwarner31) April 9, 2020
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आयपीएल फ्रंचायझी किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आयपीएल २०२० (IPL 2020) १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु देशातील परिस्थिती पहाता आयपीएल सुरु होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भारतातील कोरोना बाधितांची संख्येने ६००० चा आकडा पार केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीने पबजी खेळणं केलं बंद, या संघसहकाऱ्याने केला खुलासा
-सचिन तेंडूलकरच्या कसोटी धावांचा विक्रम मोडू शकणारे ४ फलंदाज






