---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडूला नाबाद दिल्यामुळे भारतीय चाहत्यांनी घातला गोंधळ, पंचांशी रोहितची चर्चा व्यर्थ

On: सोमवार, सप्टेंबर 5, 2022 5:23 PM
Rohit Sharma
---Advertisement---

आशिया चषक 2022 मध्ये रविवारी (4 सप्टेंबर) पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सच्या अंतराने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले. शेवटच्या षटकांमध्ये दोन्ही संघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. यादरम्यान पंचांनी दिलेल्या एका निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कर्णधार रोहितने विचारणा केल्यानंतर देखील पंचांनी निर्णय बदलला नाही. परंतु या निर्णयानंतर स्टेडियममध्ये चाहत्यांची नाराजी त्यांच्या नारेबाजीतून दिसून आली. 

हा प्रसंग डावातील 18 व्या षटकात घडला. दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करत होते. सामना कोणत्याही संघाच्या बाजून वळू शकत होता. भारतीय गोलंदाज धावांवर लगाम लावण्याचा आणि विकेट मिळवण्याचा प्रयत्न  करत होते. अशातच 18 व्या षटकात रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने टाकलेल्या चेंडू आसिफ अली (Asif Ali) याच्या बॅटच्या अगदी जवळून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. खेळाडूंना जोरदार अपील केल्यानंतरही पंचाना फलंदाज नबाद असल्याचा निर्णय दिला. परंतु भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्ण आत्मविश्वासात दिसत होता. त्याने पंचाच्या निर्णयानंतर रिव्यू घेतला.

स्टेडियममध्ये झाली नारेबाजी –
रोहितने रिव्यू घेतल्यानंतर पंचांना त्यांचा निर्णय सांगण्यासाठी तब्बल 10 मिनिटांचा वेळ घेतला. सर्व ऍन्गल पाहिले गेले. अल्ट्रा एजमध्ये बॅट आणि चेंडू एकमेकांच्या संपर्कात आल्याचे काही अंशी दिसत होते.  परंतु पंचांना तरीही फलंदाज नाबाद असल्याचेच सांगितले. या निर्णयानंतर रोहित पंचांशी चर्चा करताना दिसला, परंतु या चर्चेचा निर्णयावर काहीच परिणाम झाला नाही. यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर चीटिंग-चीटिंग अशी नारेबाजी होताना दिसली.

दरम्यान, भारताने दिलेल लक्ष्य पाकिस्तानने 19.5 षटकांमध्ये गाठले. पाकिस्तानच्या विजयात सलामीवीर मोहम्मद रिझवान याने 71, तर मोहम्मद नवाज याने 42 धावांची महत्वाची खेळी केली. रिझवान आणि नवाजमध्ये चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी पार पडली.  तत्पूर्वी भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी वेगवान सुरुवात केली. या दोघांनी प्रत्येक 28-28 धावा केल्या. तसेच विराट कोहलीने 44 चेंडूत 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या धावा विराटने 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

फलंदाजीतील धमाक्यानंतर अर्ध्यातूनच विराट का बसला मैदानाबाहेर? जाणून घ्या कारण
अखेर रिझवानला डावलून नवाजला का दिला गेला सामनावीर पुरस्कार? हे होते कारण
पुन्हा दिसले ‘माहीराट’चे प्रेम; विराट म्हणाला, ‘कसोटीची कॅप्टन्सी सोडल्यानंतर फक्त धोनीने…’ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---