---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’

On: रविवार, फेब्रुवारी 26, 2023 5:23 PM
Shahid Afridi
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटविषयी जेव्हा कधी चर्चा सुरू असते, त्यापैकी अनेकदा ही चर्चा वादाचीच असल्याचे आपण पाहिले आहे. यावेळीही पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमधील एक वाद चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी या वादाचे कारण आहे एका खेळाडूचे वय.  सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळत आहे.

या खेळाडूचे नाव आहे आयमल खान, ज्याचे कागदोपर्ती वय सांगितले गेले आहे 16 वर्ष. पण अनेकांच्या मते हा खेळाडू 16 वर्षाचा नसून त्यापेक्षा खूप मोठा आहे. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने आयमल खानच्या वयाविषयी ट्वीट केले, ज्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चर्चा सुरू झाली. पत्रकाराने ट्वीटमध्ये लिहिले की, “आयमल खान (Aimal Khan) याची 16 वर्षांचा खेळाडू म्हणून नोंद आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने खेळाडूंच्या खऱ्या वयावर लक्ष दिले पाहिजे.”

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाचा आयमल खान याचे वय सध्या 16 वर्ष आणि 246 दिवस असल्याचे सांगितले गेले आहे. आयमलचा जन्म 24 जून 2006 रोजी पेशावरमध्ये झाला आहे. या युवा खेळाडूच्या वयामुळे नेटकरी सध्या सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत आहे. यात अनेक वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा पाकिस्तान क्रिकेटमधील एखादा खेळाडू त्याच्या वयामुळे चर्चेत आणि वादात सापडला असेल. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू अफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याच्या कागदोपत्री वयामुळेही अनेकदा वाद झाला. इफ्तिखार अहमद याला नेटकरी अनेकदा ‘चाचू’ असेही म्हणतात. इफ्तिखारच्या त्याच्या वयापेक्षा खूप मोठा वाटतो. कागदोपत्री त्याचे वय 32 वर्ष आहे, पण लोकांच्या मते त्याचे वय 40-42 वर्ष असावे.

पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) देखील त्याच्या वयामुळे अनेकदा चर्चेत राहिला. आफ्रितीने देखील कागदोपत्री चुकीचे वय नोंदवले होते. आफ्रिदीने जेव्हा पाकिस्तान संघासाटी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तेव्हा त्याचे वय 16 वर्ष सांगितले गेले होते. पण नंतक त्याने स्वीकार केले की, त्यावेळी तो 16 वर्षांचा नव्हता. आफ्रिदीने त्याच्या पुस्तकात वयाच्या बाबतीत गडबड झाल्याचा खुलासा केला होता. (The Pakistani player’s age has sparked a new controversy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सतत फ्लॉप ठरणारा राहुल पत्नीसोबत महाकालेश्वराच्या चरणी! तिसऱ्या कसोटीत मिळणार का संधी?
मायदेशी परतताच वॉर्नर बनला ‘पैलवान’, हाणामारी करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---