भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. रविवारी (दि. १२ जून) रात्री खेळल्या जाणाऱ्या सामन्यात काही खेळाडू असे असतील, ज्यांचे प्रदर्शन निर्णायक ठरू शकते. पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले होते, पण गोलंदाज कुठेतरी कमी पडल्यासारखे वाटले. बाराबती स्टेडियम भारतीय संघासाठी एक ऐतिहासिक स्टेडियम राहिले आहे. आपण या लेखात दोन्ही संघातील अशा ६ खेळाडूंवर नजर टाकू ज्यांचे प्रदर्शन या स्टेडियमवर निर्णायक ठरू शकते.
इशान किशन
पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) याने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि संघाला चांगली सुरुवात दिली. अशाच प्रकारे दुसऱ्या सामन्यात देखील त्याला संघाला चांगली सुरुवात द्यावी लागेल. इशानने पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यात देखील त्याच्याकडून अशाच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा आहे.
रिषभ पंत
रिषभ पंत (Rishabh Pant) या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पंतला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. परंतु दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यात त्याने १६ चेंडूत २९ धावा केल्या होत्या, पण अशातच विकेट गमावली. यामध्ये त्याच्या २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
युझवेंद्र चहल
बारावती स्टेडियमवर फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचे आकडे उत्कृष्ट आहेत. त्याने याठिकाणी खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर चहलने जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले, तर ते संघासाठी खूपच महत्वाचे ठरणार आहे.
डेविड मिलर
आयपीएल २०२२ मध्ये डेविड मिलर (David Miller) याच्या फलंदाजीत मोठा बदल पाहिला गेला. टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघ विजयी झाला. पहिल्या सामन्यात त्याने ३१ चेंडूत ६४ धावा केल्या आणि त्याच्या संघाने सामन्यात पुनरागमन केले.
क्विंटन डी कॉक
पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकी दिग्गज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) मोठी खेळी करू शकला नाही. त्याने १८ चेंडूत २२ धावा केल्या आणि विकेट गमावली. असे असले, तरी डी कॉक आफ्रिकी संघाचा महत्वाचा फलंदाज आहे आणि दुसऱ्या सामन्यात तो संघासाठी महत्वाचे प्रदर्शन करेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे.
कागिसो रबाडा
पहिल्या सामन्यात कागिसो रबाडा (Kagiso Rabada) त्यांच्या संघासाठी महागात पडला. त्याने टाकलेल्या ४ षटकात ३५ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. असे असले तरी, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रबाडा त्याच्या फॉर्ममध्ये परतू शकतो. आफ्रिकी संघाचा विजय किंवा पराभव बऱ्यापैकी रबाडाच्या गोलंदाजीवर ठरू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाळणा हालला! आरसीबीच्या माजी खेळाडूच्या घरी आला नवा पाहुणा, पत्नीने मुलाला दिला जन्म
कर्णधार रिषभ पंतची बॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओकणार आग! पूर्ण करणार षटकारांचे ‘हे’ खास शतक
पहिल्या सामन्यात दिली नाही संधी म्हणून उमरानने काढला राग? नेट्समध्ये तोडून टाकली रिषभ पंतची बॅट